तारा सुतारिया म्‍हणते, ऋतिक रोशन ‘हॉट’ टीचर !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – ‘स्टुडेंट ऑफ़ द ईअर २’ या चित्रपटातील विद्यार्थीनीच्या भूमिकेत असणारी अभिनेत्री तारा सुतारिया हीने सुप्रसिद्ध ऋतिक विषयी तिचे मत मांडले आहे. ती म्हणते की, ऋतिक रोशन हा हॉट शिक्षकांपैकी एक आहे. सुपरस्टार ऋतिर रोशनने आपल्या अभिनय शैलीने चाहत्यांनी नेहमीच भारावून सोडले आहे.

एका मुलाखतीत ताराने सांगितले की, मला वाटते की, ऋतिक रोशन एक चांगला शिक्षक असून हॉट शिक्षकही आहे. यावरुन असे दिसते की, तारा सुतारिया ऋतिकची मोठी चाहती आहे. आगामी चित्रपट ‘सुपर ३०’ यामध्ये ऋतिक रोशन गणिताच्या शिक्षकाची भूमिका साकारणार आहे. त्याची प्रत्येक चित्रपटातील भूमिका चांगली साकारतो. या चित्रपटातील भूमिका ही चांगल्याप्रकारे साकारेल, अशी अपेक्षा आहे.

‘सुपर ३०’ हा चित्रपट २६ जुलै ला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या पोस्टरने चाहत्यांचा आणखी उत्साह वाढला आहे. हा चित्रपट बिहारमधील एका शिक्षकावर आधारित आहे. यांचे नाव आनंद कुमार. यांना गणिताचे जादुगर म्हटले जाते. हे बिहारमध्ये ‘सुपर ३०’ नावाचा एक प्रोग्रॅम चालवतात. त्यांनी अनेक गरीब आणि हुशार मुलांना कोणतीही फी न घेता आयआयटीमध्ये प्रवेश मिळवून दिला आहे. ज्या मुलांची आर्थिक परिस्थिती नाही त्यांचा सर्व खर्च ते स्वतः करतात. या कामात त्यांना आई आणि पत्नीचा देखील सपोट आहे. ही कथा आता पडद्यावर दाखविण्यात येणार आहे.

You might also like