‘कलंक’ चित्रपटाचं पहिलं गाणं प्रदर्शित,

आलिया-माधुरीच्या जुगलबंदीने जिंकली प्रेक्षकांची मनं

मुंबई : वृत्तसंस्था – दमदार संवाद, डोळे दिपवणारे भव्य दिव्य सेट आणि बॉलिवूडमधील तगडी स्टारकास्ट असणाऱ्या ‘कलंक’ या सिनेमातील ‘घर मोरे परदेसिया’ हे पहिलं गाणं प्रदर्शित झालं आहे. हे गाणं आलिया भट्ट आणि माधुरी दीक्षित यांच्यावर चित्रित करण्यात आलं असून याची कोरिओग्राफी प्रसिद्ध कोरिओग्राफर रेमो डिसोझाने केली आहे.

घर मोरे परदेसिया हे गाणं प्रसिद्ध गायिका श्रेया घोषाल आणि वैशाली माडेने गायलं असून संगीतकार प्रीतम यांनी या गाण्याला संगीत दिलं आहे. तर अमिताभ भट्टाचार्य यांनी हे गाणं लिहिलं आहे. निर्माता करण जोहरनं या गाण्याच्या प्रदर्शनाची माहिती ट्विटरवरून दिली. या गाण्यातील आलिया आणि माधुरी यांच्या लूकनं प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.

https://twitter.com/karanjohar/status/1107537381794766848

कलंक’ची नेमकी कथा काय हे अद्याप गुलदस्त्यात असले तरी चित्रपटाची कथा १९४५ च्या आसपासच्या काळात घडते. शिवाय, भारत-पाक फाळणीच्या दाहक अनुभवावर हा चित्रपट आधारलेला आहे अशी चर्चा आहे. माधुरी दीक्षित, आलिया भट्ट, सोनाक्षी सिन्हा, संजय दत्त, वरुण धवन, आदित्य रॉय कपूर यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.

‘कलंक’ ठरला सर्वाधिक पाहिला गेलेला टीझर –
कलंकचा टीझर प्रदर्शित होण्याच्या दिवशी यू्ट्यूब, फेसबुक, इन्स्टाग्राम या तिन्हींवर मिळून तब्बल २ कोटी ६७ लाखांहूनही अधिक लोकांनी हा टीझर पाहिला. तितक्याच मोठ्या प्रमाणात हा व्हिडिओ शेअरदेखील करण्यात आला. येत्या १७ एप्रिलला हा चित्रपट प्रदर्शित होत आहे.

kalank