Song Sakhiyan 2 Releases | अक्षय कुमार आणि वाणी कपूरच्या चित्रपटाचे गाणे झाले रिलिज, पहा व्हिडिओ

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Song Sakhiyan 2 Releases | अक्षय कुमार आणि वाणी कपूरचा आगामी चित्रपट बेल बॉटम चे दुसरे गाणे रिलिज करण्यात आले आहे. हे गाणे मनिंदर बटर यांनी तयार केले होते. हे त्याचे नवीन व्हर्जन आहे. गाण्याचे बोल ’सखियां’ (Song Sakhiyan 2 Releases) आहेत.

अक्षय कुमार आणि वाणी कपूर (Akshay Kumar and Vani Kapoor) दोघेही चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये गुंतले आहेत. दोघांनी चित्रपटाचे पहिले गाणे रिलिज केले होते, आता दुसरे गाणे ’सखियां 2.0’ रिलिज केले आहे (Song Sakhiyan 2 Releases). हे गाणे मनिंदर बटर (Maninder Butter) यांच्या 2018 च्या पंजाबी हिट नंबर सखियां (Punjabi hit number Sakhiyan) वरून घेतले आहे.

अक्षय कुमारने सोशल मीडियावर गाणे शेयर करत लिहिले आहे की, ’सखियां 2.0 ची लाट. मला वाटते तुम्ही अनुभव घ्यावा, गाणे रिलिज झाले आहे. सखियां, बेल बॉटम’ हे गाणे 3 मिनिटाचे आहे. यामध्ये अक्षय कुमार आणि वाणी कपूरची जोडी रोमँटिक दिसत आहे. दोघांची केमिस्ट्री पाहण्यासारखी आहे.

सखियां 2.0 बब्बू, मनिंदर भट्टर आणि तनिष्क बागची (Tanishq Bagchi) यांनी तयार केले आहे. तर गाण्याचे बोल मनिंदर आणि जारा खान (Maninder and Zara Khan) चे आहेत. बेल बॉटम (Bell Bottom) मध्ये अक्षय कुमार रॉ एजंटची भूमिका करत आहे. तर वाणी कपूर त्याच्या पत्नीच्या भूमिकेत दिसणार आहे. बेल बॉटमचे दिग्दर्शन रंजीत तिवारी (Ranjit Tiwari) ने केले आहे.

बेल बॉटम 19 ऑगस्टला रिलिज होत आहे.
बॉलीवुड अभिनेत्री वाणी कपूर मागच्यावेळी वॉर (War) चित्रपटात दिसली होती.
हा चित्रपट प्रेक्षकांना खुप पसंत पडला होता.
या चित्रपटात ऋतिक रोशन आणि टायगर श्रॉफ (Hrithik Roshan and Tiger Shroff) ची महत्वाची भूमिका होती.
दोघांनी खुप दमदार अ‍ॅक्शन सीन केले होते. ऋतिक आणि वाणीची केमिस्ट्री सुद्धा चांगली जमली होती.

Web Title :-  Song Sakhiyan 2 Releases | bell bottom sakhiyan 2 song releases maninder buttar songs recreated version features akshay kumar and vaani kapoor

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Chikki Scam Case | चिक्की घोटाळा प्रकरणात आणखी एक नवा ट्विस्ट; धनंजय मुंडेंचा पंकजा मुंडेंवर अप्रत्यक्ष निशाणा

Cyrus Poonawalla | ‘कोव्हिशिल्ड’चा तिसरा बूस्टर डोस आवश्यक, सायरस पुनावाला यांचे मत (व्हिडीओ)

Pune Corporation | नाना पेठेतील ‘दी डिप्रेस्ड क्लासेस मिशन’च्या जागेचा करार वाढवून द्यावा; राष्ट्रवादी कॉंग्रेसचा शहर सुधारणा समितीकडे प्रस्ताव