अभिनेत्री आलियाची आई सोनी राजदानकडून ‘अफजल गुरू’ प्रकरणाच्या चौकशीची मागणी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – बॉलिवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्री सोनी राजदान यांनी मंगळवारी २००१ मध्ये संसद हल्ल्यातील दोषी अफजल गुरूला बळीचा बकरा का बनवले गेले, तसेच चौकशी अधिकाऱ्यांच्याविरोधात आवाज उठविल्यानंतर त्याला 2013 मध्ये फाशी का देण्यात आली, या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी अशी मागणी केली आहे. सोनी राजदान यांनी आपल्या वादग्रस्त ट्विटमध्ये म्हटले आहे की, “हा न्यायाचा तमाशा आहे. जर तो निर्दोष असेल तर मग त्याला मृत्यूपासून कोण परत आणेल? म्हणूनच फाशीची शिक्षा इतकी सहजासहजी वापरली जाऊ नये.”

प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टची आई सोनी म्हणाल्या कि, “अफझल गुरूला बळीचा बकरा का बनविण्यात आले, याबद्दल ठोस चौकशी झाली पाहिजे.” आपले मत व्यक्त करताना त्यांनी या ट्विटमध्ये पुढे लिहिले की, “अफझलसारख्या लोकांना दहशतवादी कारवाया करण्यासाठी छळ व जबरदस्ती कशी केली जाते आणि नंतर त्यांना फाशीची शिक्षादेखील दिली जाते, याची चौकशीही व्हायला हवी.”

त्यांचे हे ट्विट जम्मू-काश्मीरचे पोलिस उपअधीक्षक (डीएसपी) दविंदरसिंग यांना ११ जानेवारी रोजी अटक करण्यात आल्या संदर्भात करण्यात आले. त्यांच्यावर तीन दहशतवाद्यांबरोबर कारमध्ये असल्याचा आरोप आहे.

दरम्यान, तिहार तुरुंगातून अफझल गुरूने त्याचे वकील सुशील कुमार यांना लिहिलेल्या पत्रात दविंदरसिंग यांचे नाव घेण्यात आले होते. 9 फेब्रुवारी 2013 रोजी गुरूला फाशी देण्यात आली. अफजल गुरू 13 डिसेंबर 2001 रोजी झालेल्या संसदेच्या हल्ल्यात दोषी ठरले होते. त्यामध्ये पाच दहशतवाद्यांसह 14 लोक ठार झाले होते. सध्या एनआयए सिंग यांची चौकशी करीत आहे.

फेसबुक पेज लाईक करा –  

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like