‘महेश भट्ट यांनी कंगनाला चप्पल फेकून मारली होती’ : कंगनाच्या बहिणीचा खुलासा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – अभिनेत्री आलिया भट्ट आणि कंगना रणौत यांच्या वादात आता आलियाची आई सोनी राजदान आणि कंगणाची बहिण रंगोली यांनीही उडी घेतली आहे. कंगणा-आलिया यांचा वाद मिटण्याऐवजी अधिकच वाढताना दिसत आहे. कारण या आरोप प्रत्यारोपात कंगणाला दिग्दर्शक महेश भट्ट यांनी चप्पल फेकून मारल्याचं म्हटलं आहे.

कंगनाने आलियावर निशाणा साधल्यानंतर आलियाची आई सोनी राजदान यांनी ट्विट करत कंगणावर टीका केली होती. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले होते की, “महेश भट्ट यांनी कंगनाला चित्रपटांमध्ये ब्रेक दिला. परंतु हीच कंगना सतत महेश भट्ट यांच्यावर, पत्नी व मुलीवर टीका करते आहे. यावर मी काय बोलू ? हे असं सारं करण्यामागे तिचा हेतू तरी काय ?” असं खोचक ट्विट सोनी राजदान यांनी केलं होतं. यानंतर कंगनाची बहिण रंगोलीने सोनी यांना सडेतोड उत्तर दिले आहे.

https://twitter.com/Rangoli_A/status/1118177015394213888

सोनी राजदान यांना प्रत्युत्तर देत रंगोली म्हणाली की, “तुम्ही आधी हा भ्रम दूर करा की, महेश भट्ट यांनी कंगनाला चित्रपटांमध्ये ब्रेक दिला. कंगनाला खरा ब्रेक अनुराग बासू यांनी दिला आहे. ज्या चित्रपटातून कंगनाने चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं त्या चित्रपटांमध्ये महेश भट्ट केवळ क्रिएटीव्ह डायरेक्टर म्हणून काम करत होते. याशिवाय महेश भट्ट यांनी कंगनाला धोखा चित्रपटासाठी विचारलं होतं. मात्र कंगनाने या चित्रपटाला नकार दिल्यानंतर महेश भट्ट यांनी कंगनाला बरंच काही सुनावलं होतं.”

https://twitter.com/Rangoli_A/status/1118177434421960707

आपल्या आणखी एका ट्विटमध्ये रंगोली म्हणते की, “लम्हे या चित्रपटाच्या प्रिव्ह्युदरम्यान दरम्यान कंगनाला महेश भट्ट यांनी चप्पल सुद्धा फेकून मारली होती. त्यावेळी कंगना फक्त 19 वर्षांची होती. या वयात तिच्या मनावर इतके आघात झाल्यानंतर कंगना रात्रभर रडली होती. तिचा चित्रपट तिलाच पाहून दिला नव्हता. तिला अपमानित करत तिला बाहेरदेखील काढण्यात आले होते.” असे म्हणत रंगोलीने सोनी यांना प्रत्युत्तर दिले.

https://twitter.com/Rangoli_A/status/1118177614462472197