जायरा वसीमच्या निर्णयावर आलिया भट्टच्या आईचे ‘हे’ वक्तव्य

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – ‘दंगल’ गर्ल जायरा वसीमने बॉलिवूड सोडण्याचा निर्णयावर सगळ्या दिग्गजांनी प्रतिक्रिया दिली आहे. आता आलिया भट्टची आई सोनी राजदानने जायराच्या बॉलिवूड सोडण्याच्या निर्णयावर वक्तव्य केले आहे. सोनी राजदान म्हणाल्या, अल्लाहला ही हेच वाटेल की, तु तेच करावे जे तुला आवडते. जायराने बॉलिवूडला अलविदा म्हणून अल्लाहच्या मार्गावर चालण्याचे ठरविले आहे.

अध्यात्मिक रस्त्यावर चालण्यासाठी आपल्या शानदार करिअरला सोडण्याच्या तिच्या निर्णयाची चर्चा सगळीकडे होत आहे. काही लोक तिचे समर्थन करत आहे. सोनी राजने ट्विटमध्ये लिहले की, ‘तु इतकी समजदार हो की, चांगल्या वाईट गोष्टी तुला कळतील आणि तेव्हा तुला जे वाटेल ते तु कर.’

सोनी यांनी पुढे लिहले की, ‘अभिनय आणि रचनात्मक कलांमध्ये असे नाही जे तुम्हाला अध्यात्मिक रस्त्यावर चालण्यास थांबवतात. एखाद्या व्यक्तीला दुःख आणि आनंदाची जाणीव करुन देणे आणि चांगल्या काही गोष्टी जोडणे यापेक्षा सुंदर काय असु शकते. मी तिच्या निर्णयाचा आदर करते. जायरा तु खूप छोटी आहे आणि मी तुला सांगू इच्छिते की, चार वर्षानंतर तुझे विचार बदलतील. आम्ही तुझे स्वागत करतो. जायराने २०१६ मध्ये सुपरस्टार आमिर खानसोबत ‘दंगल’ चित्रपटामध्ये काम केले होते.’

अभिनेत्री कंगणा रणौतची बहिण रंगोली चंदेलने सुद्धा जायराला सपोर्ट केला आहे. रंगोलीने लिहले की, ‘लोकांनी जायराला घेरने बंद करा. एका मुलीला जर तिचा धर्म हे करण्यास रोखत आहे तर यात गैर नाही. तुम्ही तिच्याकडे बोट करण्यापेक्षा तिला समजून घ्या. तिला तिचा निर्णय घेण्याचा पुर्ण अधिकार आहे.

ताण-तणाव दूर करून आनंदी जीवन जगा, ५ सोप्या पद्धती

तुम्ही खात असलेले अन्न हे शरीर व मनासाठी आरोग्यवर्धक आहे का ?

विविध रंगाच्या बाटल्यांमधील पाणी सेवन करा, आरोग्य सुधारेल

‘तारूण्य’ टिकवण्यासाठी हसत रहा, जाणून घ्या महत्वाचे फायदे

बुद्धविहार तसेच उर्वरित रहिवाशांचे त्याच ठिकाणी पुनर्वसन करणार

आदिवासींसाठी स्वतंत्र आरोग्य संस्था असायला हवी