Sonia Doohan On Supriya Sule | “ती मुलगी अन आम्ही बाहेरचे” ; पक्षातूनच सुप्रिया सुळेंवर गंभीर आरोप

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – Sonia Doohan On Supriya Sule | लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षात फूट पडल्यांनंतर अजित पवार (Ajit Pawar) हे काही नेत्यांना घेऊन महायुतीत (Mahayuti) सामील झाले. काही नेते परतही आले. मात्र आता राष्ट्रवादी शरद पवार गटाला (Sharad Pawar NCP) दोन महत्वाचे नेते सोडचिठ्ठी देणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात होत्या. (Sonia Doohan On Supriya Sule)

राष्ट्रीय युवक अध्यक्ष धीरज शर्मा (Dheeraj Sharma) आणि सोनिया दुहन पक्षाला रामराम करणार करणार असल्याची चर्चा आहे. धीरज शर्मा हे युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष होते. पण त्यांनी फेसबुकवर पोस्ट शेअर केली आहे. या फेसबुक पोस्टमध्ये राष्ट्रवादी पक्षातील सगळ्या पदांचा राजीनामा दिल्याचे त्यांनी म्हटले आहे.

त्यांनतर आता सोनिया दुहन यांनी माध्यमांशी संवाद साधत याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. “ती मुलगी अन आम्ही बाहेरचे” म्हणत त्यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर निशाणा साधला आहे.

“मी अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही, मात्र मागील काही दिवसांपासून घुसमट होतेय. सुप्रिया सुळेंच्या आसपासच्या लोकांमुळे निष्ठेने काम करणारे पक्ष सोडून का जात आहेत याचे उत्तर सुप्रिया सुळे यांना द्यावे लागेल. सुप्रिया सुळे स्वतःचे नेतृत्व सिद्ध करू शकल्या नाहीत” असे सोनिया दुहन यांनी म्हंटले आहे.

“मी भाजपात जाणार नाही. मी केलेल्या विधानामुळे मला पक्षातून काढले जाईल, साहेबांना कितीदा समस्या सांगायच्या. त्यांना द्विधा अवस्थेत कसे ठेवायचे कारण शेवटी त्या त्यांची मुलगी आहेत” असेही दुहन यांनी सांगितले.

पुढे त्या म्हणाल्या, ” मी अजून पक्ष सोडला नाही. अन्य कुठल्याही पक्षात प्रवेश केला नाही. मी कालच्या बैठकीला होते, मग
असे पाहायला गेले तर जेव्हा पक्षात फूट पडली, आमदारांच्या बैठकीवेळी सुप्रिया सुळेही तिथे होत्या.
मग त्यांनी अजित पवारांचा पक्ष जॉईन केला का? त्यामुळे मी अजून पक्षप्रवेश केला नाही.
शरद पवारांना आणि राष्ट्रवादीला सोडले नाही. परंतु काही गोष्टी मला सर्वांसमोर आणायच्या आहेत.
धीरज शर्मा असो वा अन्य लोक, माझ्यासारखे बरीच वर्ष निष्ठेने शरद पवारांसोबत काम करत आहेत.

शरद पवारांसाठी काहीही करण्यास तयार असलेले हे लोक अचानक पक्ष सोडण्याचा निर्णय का घेत आहेत ?
अजून कोणाचे सरकार आले नाही. ४ जूनचा निकाल लागला नाही. मी इतकी वर्ष पक्षात काम केल्यानंतर एक सांगते,
आमची पूर्ण निष्ठा शरद पवारांवर आहे. परंतु शरद पवारांची मुलगी म्हणून सुप्रिया सुळेंचा आदर आहे.
मात्र त्या आमच्या नेत्या बनू शकल्या नाहीत. सुप्रिया सुळे आणि त्यांच्या आसपासच्या लोकांमुळे आमच्यासारखे लोक
ज्याची शरद पवारांवर निष्ठा आहे ते पक्ष सोडून चालले आहेत. असे सोनिया दुहन यांनी सांगितले.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Dr Ajay Taware-Dr. Shrihari Halnor | डॉ. अजय तावरे व सहकार्‍यांवर ‘मोका’अंतर्गत कारवाई करून शासकीय सेवेतून निलंबित करा

Swapping Blood Sample-Sassoon Hospital | ससूनमधला ‘तो’ कर्मचारी गायब; पुणे पोलीस सीसीटीव्ही फुटेज तपासणार

Gurmeet Ram Rahim | हत्याप्रकरणात राम रहिमला दिलासा; हायकोर्टाकडून निर्दोष मुक्तता, CBI कोर्टाचा निर्णय रद्द

Talegaon Dabhade Pimpri Crime News | पिंपरी : आठवडे बाजारात सोनसाखळी चोरणाऱ्या चोरट्याला अटक

Porsche Car Accident Pune | पोर्शे टीमने डेटा मिळवला; बिल्डर मुलाची कुंडली मिळणार…

Swapping Blood Sample-Sassoon Hospital | अपघातातील आरोपी मुलासाठी रक्त देणाराही पोलिसांच्या ‘रडार’वर