‘या’ अटींवरच 5 वर्ष शिवसेनेचा मुख्यमंत्री काँग्रेसला मान्य

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सध्या राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नव्या आघाडीनं सत्ता स्थापनेसाठी हालचाली सुरू केल्या आहेत. पूर्ण 5 वर्ष शिवसेनेचा मुख्यमंत्री असण्यावर काँग्रेसला हरकत नाही. मात्र महत्त्वाची आणि जनहिताशी संबंधीत खाती काँग्रेसला हवी आहेत. त्यासाठी विश्वजित कदमांसह अशोक चव्हाण , पृथ्वीराज चव्हाण , बाळासाहेब थोरात ,विजय वडेट्टीवार ,के सी पाडवी ,यशोमती ठाकूर, सतेज बंटी पाटील ,सुनिल केदार या काँग्रेसच्या नेत्यांची मंत्रिमंडळात वर्णी लागू शकते.

काही वेळापूर्वी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे मंत्रिमंडळातील राष्ट्रवादीच्या नेत्यांची नावे घेऊन दाखल झाले होते. त्यानंतर आता काँग्रेसनेही आपली यादी तयार केल्याची माहिती मिळाली आहे. ग्रामीण विकास, सार्वजनिक बांधकाम, वीज, पशुपालन यासारखी महत्त्वाची खाती काँग्रेसला हवी आहेत. संभाव्य मंत्रिमंडळातही काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांनी अनुभवी नेत्यांवर जबाबदारी देण्याचे ठरवले आहे.

आघाडी सरकारमध्ये सामील असलेले अनेक नेते पुन्हा नव्या मंत्रिमंडळातही दिसण्याची शक्यता आहे. तसेच काँग्रेसचे दिवंगत नेते पतंगराव कदम यांचे चिरंजीव विश्वजित कदम यांचाही मंत्रिमंडळात समावेश असेल अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. विश्वजित कदम पहिल्यांदाच विधानसभेवर निवडून गेले आहेत.

काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी अखेर काही अटींवरच शिवसेनेसोबत जाण्यास मान्यता दिली आहे. शरद पवार यांच्याकडे काल झालेल्या साडेतीन तास चर्चेमध्ये दोन्ही पक्षांत ठरलेला किमान समान कार्यक्रम शिवसेनेने स्वीकारण्यावर व सत्तावाटपावर चर्चा झाली. त्यानंतर आज पुन्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आज पुन्हा एकदा स्वतंत्र बैठक होणार आहे.

Visit : Policenama.com