आजच्या ‘या’ 5 राजकीय घडामोडी महाराष्ट्राच्या राजकारणासाठी ‘अत्यंत’ महत्वाच्या, सरकार ‘बनणार’ की ‘बिघडणार’ ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – सत्तास्थापनेवरून काल दिवसभरात राज्यात अनेक आश्चर्यकारक राजकीय घडामोडी घडल्या. आजही अनेक नाट्यमय घडामोडी सुरूच राहतील. आज रात्री साडेआठ वाजेपर्यंत राष्ट्रवादीला बहुमताची आकडेवारी सादर करावी लागेल. अन्यथा महाराष्ट्राची वाटचाल राष्ट्रपती राजवटीकडे सुरु होईल. महाराष्ट्राच्या राजकारणात आज या पाच प्रमुख घडामोडी होऊ शकतात. ज्या महाराष्ट्राच्या राजकारणाचे पुढील चित्र स्पष्ट करतील.

1. राष्ट्रवादी कॉंग्रेस विधिमंडळ पक्षाची बैठक

मंगळवारी पुन्हा एकदा राष्ट्रवादी कॉंग्रेसची बैठक होणार आहे. या बैठकीत शिवसेनेला पाठिंबा देण्यावर चर्चा होईल. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या 54 आमदारांशी या विषयांवर चर्चा होईल. शरद पवार यांनी सोमवारी उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून त्यांना माहिती दिली की राज्यपालांच्या वतीने त्यांच्या पक्षाला सरकार स्थापनेची संधी मिळाली आहे. सरकार कसे तयार होईल, त्याचे स्वरूप काय असेल हे ठरविण्याची आता वेळ आली आहे, असा संदेश शरद पवार यांनी शिवसेनेला दिला आहे.

2. कॉंग्रेसचे नेते शरद पवार यांची मुंबईत भेट घेतील

महाराष्ट्रात शिवसेनेला पाठिंबा देण्याच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून पुढील चर्चा सुरू राहतील असे कॉंग्रेसने सोमवारी सांगितले होते. कॉंग्रेसचे नेते शरद पवार यांना सोनियांच्या संदेशासह भेटतील. या दरम्यान दोन्ही पक्षांमध्ये सरकार स्थापनेबाबत चर्चा होईल.

3. सोनिया यांच्या घरी कॉंग्रेस कोअर कमिटीची बैठक

महाराष्ट्रात सरकार स्थापनेवर दिल्लीत आज मंथन सुरूच राहणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कॉंग्रेसचा एक गट आज सकाळी 10 वाजता सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी राजलीय धोरणाबाबत भेट घेणार आहे .

4. रात्री 8.30 वाजता सत्तास्थापनेच चित्र स्पष्ट होणार

राज्यपालांनी शिवसेनेला मुदत वाढवून देण्यास नकार दिला. त्यानंतर तिसरा मोठा पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसला निमंत्रण देण्यात आलं. सत्तास्थापनेची इच्छा आणि शक्यता असेल तर 24 तासांचा अवधी कळवण्यासाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राष्ट्रवादीला दिला आहे. शिवसेना अपयशी ठरली असून आता राष्ट्रवादीची परीक्षा आहे. त्यामुळे आज रात्री साडेआठ वाजता कळेल की राज्याचे राजकारण नककी कोणत्या वळणावर आहे.

5. सायंकाळी भाजपाच्या कोर कमिटीची बैठक

आज रात्रीपर्यंत महाराष्ट्रात सरकार बनणार की नाही हे स्पष्ट होईल. मात्र या राजकीय सत्तेच्या घडामोडींध्ये भाजप काही दिवस ‘वेट अँड वॉच’च्या भूमिकेत राहतील. मात्र, त्या दिवसाच्या घडामोडींवर विचारमंथन करण्यासाठी भाजपची कोर समिती संध्याकाळी पुन्हा बैठक घेण्यात येईल.

Visit : Policenama.com 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like