सोनिया गांधी यांनी नितीन गडकरींचे केले लोकसभेत समर्थन

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कामाचे कौतुक काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांनी केले आहे. लोकसभेत गडकरी यांच्या खात्याच्या संदर्भात प्रश्न विचारला असता त्या प्रश्नावर लोकसभेत उत्तर देते वेळी खासदार गणेश सिंग यांनी गडकरी यांच्या कामाबद्दल ‘वंडरफुल्ल’ या शब्दाचा उच्चार केला आणि सर्वच खासदारांनी या संदर्भात दुजोरा देण्यासाठी बाके वाजवली त्याच वेळी सोनिया गांधी यांनी देखील बाक वाजवून गडकरी यांच्या कामाचे कौतुक केले आहे.

नितीन गडकरी सध्या केंद्राच्या दळणवळण आणि रस्ते बांधणी मंत्रालयाचा कारभार बघतात. त्यामुळे लोकसभेत देशात सुरु असलेल्या रस्ते बांधणी संदर्भात प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर सर्व खासदार माझ्या मंत्रालयावर आणि माझ्या कामावर समाधानी असल्याचे विधान नितीन गडकरी यांनी केले आहे.सर्वच खासदार माझ्या कमावरून समाधानी आहेत कारण त्यांच्या मतदारसंघात माझ्या मंत्रालयाचे काम जोरात चालू आहे असे गडकरी म्हणताच सर्व खासदारांनी बाके वाजवून त्यांच्या विधानाचे समर्थन केले. या वेळी सोनिया गांधी यांनी हि बाक वाजवून नितीन गडकरी यांच्या विधानाचे समर्थन केले आहे.

रायबरेली मतदारसंघातील रस्त्यांच्या स्थिती बाबत नितीन गडकरी यांनी लक्ष घालावे असे सोनिया गांधी यांनी म्हणले होते. त्यानंतर गडकरी यांनी रायबरेली मतदारसंघातील रस्त्याकडे विशेष लक्ष देऊन तेथील रस्त्यांची स्थिती सुधारली आहे. ऑगस्ट २०१८ मध्ये सोनिया गांधी यांनी त्यांच्या मतदारसंघातील रस्त्यांची कामे केली म्हणून पत्र लिहून आभार मानले होते.