Sonia Gandhi | ‘मी इंदिरा गांधींची सून आहे, कुणालाही…’, जुना व्हिडीओ व्हायरल (व्हिडीओ)

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भाजपाने (BJP) आता ईडीचे (ED) हत्यार काँग्रेस नेत्या (Congress Leader) सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांच्यावर उगारले आहे. नॅशनल हेराल्ड प्रकरणी (National Herald Case) ईडीने नोटीस बजावल्याने आज सोनिया गांधी (Sonia Gandhi) चौकशीसाठी ईडीसमोर हजर झाल्या आहेत. यामुळे देशभरातील काँग्रेस नेते आणि कार्यकर्ते निषेध आंदोलन करत आहेत. महाराष्ट्रात देखील ईडीच्या कारवाईविरोधात ठिकठिकाणी आंदोलने झाली.

 

मुंबईत ईडी कार्यालयासमोर (Mumbai ED Office) काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. यावेळी काँग्रेस आमदार भाई जगताप (MLA Bhai Jagtap) आणि इतर काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. सोनिया गांधी यांच्या ईडी चौकशीच्या (ED Inquiry) पार्श्वभूमीवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी सोनिया गांधींचा एक जुना व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. हा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

 

या व्हिडीओमध्ये एका प्रश्नाच्या उत्तर देताना सोनिया गांधींनी केलेले विधान काँग्रेसच्या नेतेमंडळींकडून, तसेच काँग्रेसच्या मित्रपक्षांकडून व्हायरल केले जात आहे. हा व्हिडीओ नेमका कधीचा आहे, हे अद्याप समजलेले नाही. पण आजच्या ईडीच्या चौकशीच्या निमित्ताने हा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

 

मी इंदिरा गांधींची (Indira Gandhi) सून आहे आणि कुणालाही घाबरत नाही, असे सोनिया गांधी या व्हिडीओमध्ये बोलताना दिसत आहेत.
हा व्हिडीओ शेअर करताना नाना पटोले यांनी #सत्यसाहससोनिया_गांधी असा हॅशटॅग दिला आहे.
काँग्रेसचा मित्रपक्ष जनअधिकार पक्षाचे अध्यक्ष पप्पू यादव (Pappu Yadav) यांनी देखील सोनिया गांधींच्या ईडी चौकशी संदर्भात ट्विट केले आहे.

 

पप्पू यादव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर (PM Narendra Modi) निशाणा साधत
या ट्विटमध्ये म्हटले आहे की, राहुल गांधींना घाबरवू शकला नाहीत.
मोदीजी, तुम्हाला माहिती आहे ना, की सोनिया गांधी त्यांच्या आई आहेत?

 

Web Title :- Sonia Gandhi | congress president sonia gandhi viral video on ed enquiry national herald case

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा