काँग्रेसच्या मंत्र्यांच्या यादीला सोनिया गांधींचा ‘ग्रीन सिग्नल’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन  – शपथविधी झाल्यानंतरही गेली पाच दिवस रखडलेल्या मंत्रिमंडळ खातेवाटप शनिवारी जाहीर होणार आहे. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी काँग्रेसच्या खातेवाटपाला रात्री उशिरा हिरवा कंदील दिला. त्यानंतर आता ठाकरे मंत्रिमंडळातील ४२ मंत्र्यांचे खाते वाटप जाहीर करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

शिवसेना व राष्ट्रवादी यांच्या मंत्र्यांच्या खातेवाटपाची यादी तयार असून काँग्रेसच्या यादीला पक्षश्रेष्ठीकडून अंतिम मान्यता मिळत नसल्याने खातेवाटप रखडले होते. काँग्रेसच्या वाट्याला १० खाती आली आहेत. त्यानुसार बाळासाहेब थोरात – महसुल, सार्वजनिक बांधकाम – अशोक चव्हाण,  नितीन राऊत-ऊर्जा, अस्लम शेख वस्त्रोद्योग, मत्स्यव्यवसाय व बंदरे,

वर्षा गायकवाड – शालेय शिक्षण,के.सी.पडवी -आदिवासी विकास, उच्च शिक्षण – अमित देशमुख, सुनील केदार – वैद्यकीय शिक्षण, विजय वडेट्टीवार – दुग्ध विकास व पशुसंवर्धन, यशोमती ठाकूर – महिला व बालकल्याण आदी खाती काँग्रेसच्या वाट्याला आली आहेत. शिवसेनेला १२ मंत्रीपदे, राष्ट्रवादी काँग्रेसला १४ मंत्रीपदे देण्यात आली आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/