home page top 1

सोनिया गांधी, मनमोहन सिंग हे पी. चिंदबरम यांची तिहार जेलमध्ये भेट घेणार

नवी दिल्ली : वृत्त संस्था – काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग हे आज माजी केंद्रीय अर्थ मंत्री आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेता पी़ चिदंबरम यांची तिहार तुरुंगात जाऊन भेट घेणार आहेत.

गेल्या एक महिन्यांपासून पी चिंदबरम हे सीबीआयच्या कोठडीत होते. सध्या त्यांची न्यायालयीन कोठडीत तिहार तुरुंगात रवानगी करण्यात आली आहे.

आईएनएक्स मीडियामध्ये परदेशी गुंतवणुकीस परवानगी देताना त्यात अनियमितता झाली असून चिंदबरम यांनी किर्ती याच्या मार्फत लाच घेतल्याचा आरोप आहे.

चिंदबरम यांना सीबीआयने अटक केल्यानंतर काँग्रेसने त्याचा विरोध केला होता. मात्र, आता चिंदबरम यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे.

एखाद्या माजी पंतप्रधानाने आरोप असलेल्या व्यक्तीची तुरुंगात जाऊन भेट घेण्याची ही पहिलीच घटना असणार आहे.

Visit : Policenama.com

Loading...
You might also like