‘नो कमेंट’ ! महाराष्ट्रातील सत्तास्थापनेबाबत सोनिया गांधींनी सांगितलं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – राज्यात सत्तास्थापनेचा तिढा कायम असताना दिल्लीत याबाबत खलबते होताना दिसत आहेत. शरद पवारांनी दिल्लीला गेल्यावर सत्तेबाबत सेना भाजपला विचार असे म्हणत गुगली टाकली होती. त्यानंतर संसदेबाहेर सोनिया गांधी यांना सत्ता स्थापनेबाबत पत्रकारांनी विचारले असता त्यांनी याबाबत भाष्य करण्यास नकार देत ‘नो कमेंट’ असे उत्तर दिले.

पवार म्हणाले ‘मला का विचारता’
शरद पवार दिल्लीला पोहचल्यावर पत्रकारांनी त्यांना सत्ता स्थापनेबाबत विचारले असता सेना भाजपकडे संख्याबळ आहे तुम्ही त्यांना विचारा मला का विचारता असा उत्तर शरद पवारांनी दिले होते. त्याचप्रमाणे आम्ही आघाडीमध्ये लढलो होतो म्हणून चर्चा करण्यासाठी आलो असल्याचे देखील पवारांनी स्पष्ट केले होते.

संजय राऊत म्हणतात, मुख्यमंत्री शिवसेनेचाच
शिवसेना खासदार संजय राऊत हे वारंवार मुख्यमंत्री हा शिवसेनेचाच होणार अशी गर्जना करत आहेत. त्याचप्रमाणे येत्या दोन दिवसात राज्यातील सत्तास्थापनेचे चित्र स्पष्ट होईल असे मत संजय राऊत यांनी व्यक्त केले होते.

26 नोव्हेंबर पर्यंत महाशिवआघाडीचे सरकार स्थापन होणार
येत्या 25 तारखेला राज्यात महाशिवआघाडीचे सरकार स्थापन होईल असे सूचक विधान शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार यांनी केले आहे. एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सत्तार बोलत होते. त्याप्रमाणे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या सर्व आमदारांना तातडीने मुंबईत बोलावले आहे. यावेळी आमदारानं पॅन कार्ड, आधार कार्ड असे ओळखपत्र आण्यास देखील सांगितले असून चार पाच दिवसांच्या राहण्याच्या तयारीने या असे आदेश आमदारांना देण्यात आले आहेत असे सत्तार यांनी सांगितले.

Visit :  Policenama.com