सोनिया गांधींनी पुन्हा एकदा अशोक चव्हाणांवर सोपवली ‘ही’ मोठी जबाबदारी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – काही दिवसापूर्वी चार राज्ये आणि एक केंद्रशासित प्रदेशामधील विधानसभा निवडणूका झाल्या. यामध्ये काँग्रेसला म्हणावे तसे काहीच यश मिळाले नाही. यामुळे काँग्रेसच्या उच्च स्तरावर याबाबत बैठक घेण्यात आलीय. पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, तमिळनाडू, पुदुच्चेरी या राज्यामध्ये काँग्रेसला पराभव पत्करावा लागला आहे. या राज्यात म्हणावी तशी कामगिरी दिसून आली नसल्याने या राज्यातील पराभवाचा आढावा घेण्यासाठी काँग्रेसच्या तत्कालीन अध्यक्षा सोनिया गांधी यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यावर ही जबाबदारी देण्यात आली आहे.

विधानसभेच्या निकालावरून सोनिया गांधी यांनी चिंता व्यक्त केली आहे. त्या म्हणाल्या कि, आपण एक समिती तयार करू ती पराभवाच्या प्रत्येक पैलूवर विचार करेल. केरळ आणि आसाममध्ये का पराभव झाला हे आपण शोधून काढलं पाहिजे. पश्चिम बंगालमध्ये आपल्या हाताला एकही जागा लागली नाही. या गोष्टी त्रासदायक असल्या तरीही त्यांचा सामना करून त्याबाबत विचार करायला हवा. याकडे आपण दुर्लक्ष केलं तर आपल्याला यातून धडा घेता येणार नाही. अशी माहिती सूत्राकडून मिळाली आहे. यावरून अधिक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली ५ सदस्यीय समिती तयार केलीय. यामध्ये, ज्येष्ठ नेते सलमान खुर्शिद, मनीष तिवारी, व्हिन्सेंट एच. पाला आणि जोथी मनी यांचा समावेश केला आहे. तर ५ राज्यांना भेट देऊन तेथील कार्यकर्त्यांशी, उमेदवारांशी आणि राज्याच्या नेतृत्वाशी चर्चा करून ही समिती एक अहवाल बनवून हा अहवाल सोनिया गांधींना देण्यात येणार आहे.

काँग्रेस कार्यसमितीच्या बैठकीत काँग्रेसच्या विधानसभा निवडणुकीतील पराभवावर चर्चा झाली. असे सूत्रांकडून सांगण्यात आलं आहे. या झालेल्या विधानसभा निवडणुकीत पश्चिम बंगालमध्ये काँग्रेसची अवस्था बिकट झाली आहे. पहिल्यांदाच काँग्रेसला एकही सीट मिळाली नाही. सीपीआयएम आणि फुरफुरा शरिफचे प्रमुख मौलवी अब्बास सिद्दिकी यांचा पक्ष भारतीय धर्मनिरपेक्ष फ्रंटसोबत आघाडी केली होती. तरी देखील काँग्रेसला राज्यात एक सुद्धा जागा जिंकता आली नाही. काँग्रेसच्या बालेकिल्ल्यांतही त्यांना पराभव पत्करावा लागला आहे. तसेच, केरळ, आसाम, पुदुच्चेरी येथे काँग्रेसला जोरात फटका बसला आहे. यावरून आता स्थापन केलेली सामिती या राज्यात पराभव झाल्याची कारणे काय आहेत. हे शोधून काढणार आहेत.