सोनिया गांधींच्या प्रकृतीबाबत मोठी बातमी ! पोटात ‘इन्फेक्शन’ झाल्यानं 24 तासांपासून उपचार अद्यापही सुरू

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांना पोटाचं इन्फेक्शन झालं आहे. दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. रुग्णालयाचे चेअरमन (बोर्ड ऑफ मॅनेजमेंट) डॉ डी एस राणा सोमवारी सायंकाळी म्हणाले, “सोनिया गांधी 2 फेब्रुवारी रोजी रुग्णालयात दाखल झाल्या होत्या. त्यांच्या टेस्ट्स सुरू आहेत. त्यांच्या पोटात इन्फेक्शन आहे ज्याच्यावर उपचार सुरू आहेत.”

सोनिया गांधींना रविवारी सायंकाळी सर गंगाराम रुग्णलयात भरती करण्यात आलं होतं. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.