Sonia Gandhi | काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीची तारीख निश्चित; सोनिया गांधींचा नेत्यांना सूचक संदेश

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  Sonia Gandhi | मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या पक्षांतर्गत घडामोडींच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या (congress) कार्यकारी समितीची बैठक आज (शनिवारी) दिल्लीत सुरू आहे. सोनिया गांधींच्या (Sonia Gandhi) नेतृत्वाखाली सुरू असलेल्या या बैठकीमधून सोनिया गांधींनी पक्षातील जी-23 नेत्यांना एक सूचक संदेश दिला आहे. आगामी 5 राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस कार्यकारीणीची बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. या बैठकीला पक्षाचे 52 वरिष्ठ नेते उपस्थित आहेत. यावेळी सोनिया गांधीनी नेत्यांना सूचक संदेश दिला.

या होत असलेल्या बैठकीत काॅग्रेस अध्यक्षपदाबाबत (Congress President) चर्चा झाली. यावेळी सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांनी भाष्य केलं आहे.
दरम्यान. येणा-या 1 नोव्हेंबरपासून काँग्रेसच्या संघटनात्मक निवडणुकांची प्रक्रिया होण्याची शक्यता आहे. असं सांगण्यात येत आहे. तर, मी पक्षातील नेत्यांशी खुल्या मनाने बोलते.
मात्र, माझ्याशी माध्यमांद्वारे बोलण्याची गरज नाहीये, असं म्हणत सोनिया गांधीनी (Sonia Gandhi) काँग्रेस नेत्यांना सुनावलं आहे.

पुढे बोलताना सोनिया गांधी म्हणाल्या की, सध्या प्रत्येक पक्षाच्या सदस्याला काँग्रेसचं पुनरुज्जीवन व्हावं असं वाटतंय.
पण यासाठी एकात्मता आणि पक्षाचं हित सर्वोतोपरी ठेवणं आवश्यक असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
तसेच, मला माहितीय की मी हंगामी अध्यक्षा आहे. यापूर्वीच निवडणुका घ्यायच्या होत्या मात्र, कोरोनामुळे निवडणुका घेता आल्या नाहीत.
आता लवकरच पक्ष संघटनेच्या निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केले जाईल. असं सोनिया गांधी यांनी म्हटलं आहे.

 

दरम्यान, येत्या नोव्हेंबरमध्ये ही प्रक्रिया सुरु होईल आणि 2022 च्या सप्टेंबर महिन्यात काँग्रेसला नवा अध्यक्ष मिळेल, अशी शक्यता आहे.
त्यामुळे आता आगामी वर्षी काँग्रेसला नवा अध्यक्ष मिळण्याची शक्यता आहे. पंरतु, महत्वाचे म्हणजे सोनिया गांधींच्या नंतर पुन्हा गांधींच अध्यक्ष होणार की हे पद कुटुंबाबाहेर जाणार, हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.

 

Web Title : Sonia Gandhi | the date for the election of the president was fixed sonia gandhi declared

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Parenting | मुलांच्या ‘या’ 7 गोष्टी चुकीच्या मार्गाला जाण्याचे संकेत, दिसताच व्हा सावध; जाणून घ्या

7th Pay Commission | दिवाळीपूर्वी केंद्रीय कर्मचार्‍यांना मिळू शकतात 3 मोठे गिफ्ट, ‘इथं’ जाणून घ्या सर्वकाही

CM Uddhav Thackeray | ‘गरम पाण्याच्या नावाखाली कोमट पाणी’; मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंच्या भाषणावर ‘मनसे’चा निशाणा