आगामी 6 महिन्यांसाठी सोनिया गांधीचं काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष, कार्यकारिणीचा 7 तासानंतरच्या बैठकीनंतर निर्णय

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – काँग्रेस पक्षाच्या आज झालेल्या कार्यकारिणीच्या बैठकीत प्रचंड हंगामा झाला. आरोप-प्रत्यारोप झाले. काँग्रेसचे गुलाम आझाद, कपिल सिब्बल यांच्यावर भाजपाशी हातमिळवणी केल्याबद्दल शिंतोडे उडवण्याच्या प्रयत्नाच्या बातम्या प्रसारमाध्यमांनंतर पसरल्या. त्यानंतर पक्षाकडून सावरासावरी करण्यात आली. 7 तासा चाललेल्या काँग्रेसच्या कार्यकारिणीच्या बैठकीत आगामी 6 महिन्यांसाठी सोनिया गांधीच काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष राहतील असं सांगितल्यात आल्याचं एएनआय वृत्तसंस्थेने ट्विट केलं आहे.

एएनआय वृत्तसंस्थेला सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आगामी 6 महिन्यांसाठी सोनिया गांधीच काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष राहणार आहेत. त्यानंतर पुढचा अध्यक्ष निवडण्यात येणार आहे. दरम्यान, सोनिया गांधी यांनी नवीन अध्यक्ष निवडा आणि मला रिलीव्ह करा असा स्पष्ट संदेश कार्यकारिणीला दिला होता. राहूल गांधी यांनी देखील आपण कोणाबद्दलही काही एक बोललो नसल्याचं स्पष्ट केले. त्यानंतर आझाद आणि कपिल सिब्बल यांनी देखील त्यांच्या भावना व्यक्त केल्या. दरम्यान, आगामी 6 महिन्यांसाठी सोनिया गांधीच काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष असणार असल्याचं एएनआय वृत्तसंस्थेनं सांगितलं आहे.