‘या’ अभिनेत्रीच्या जन्मानंतर 16 दिवसांनी झाले होते वडिलांचे निधन, असा झाला प्रवास

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूडमधील प्रसिद्ध कलाकारांपैकी एक हिमेश रेशमिया आपल्या आगामी चित्रपटासाठी चर्चेत आहे. चित्रपटात तो अभिनेत्री सोनिया मान हिच्यासोबत रोमांस करताना दिसणार आहे. सोनिया मान अनेक दिवसांपासून चित्रपटसृष्टीत सक्रिय आहे, पण हिमेश रेशमियासोबतचा तिचा चित्रपट खूप महत्वाचा मानला जात आहे. आता या चित्रपटातून तिची कामगिरी किती चांगली होईल हे आगामी काळात कळेल. चला तर मग जाणून घेऊया या अभिनेत्रीच्या आयुष्याशी संबंधित काही महत्वाच्या गोष्टी….

https://www.instagram.com/p/B6UtmLgHEfr/

सोनिया मान हीचा जन्म 10 सप्टेंबर 1990 रोजी उत्तराखंडमधील हल्द्वानी येथे झाला. सोनियाचे वडील बलदेवसिंग मान हे लेफ्ट विंगचे एक्टिविस्ट आणि लेखक होते. एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनूसार, 26 सप्टेंबर रोजी सोनियाच्या जन्मानंतर 16 दिवसांनी अमृतसरमध्ये तिच्या वडिलांना अतिरेक्यांनी ठार मारले होते.

https://www.instagram.com/p/B5W-OHtno9G/

https://www.instagram.com/p/BpLtMOdnOfy/

बलदेव मान पहिल्यांदा आपल्या मुलीला भेटण्यासाठी गावाला जात असताना हा अपघात झाला. डोक्यावरुन वडिलांची सावली उठल्यानंतर कुटुंबावर दु: खाचा डोंगर कोसळला. वडिलांच्या निधनानंतर सोनियाचे पालन पोषण पंजाबच्या अमृतसरमध्ये झाले होते. सर्वात आनंद देणारी गोष्ट म्हणजे सोनिया मानच्या वडिलांनी मुलीच्या मृत्यूपूर्वी पत्र लिहिले. त्यात त्यांनी आपल्या मुलीच्या भविष्याशी संबंधित स्वप्नांविषयी लिहिले होते.

https://www.instagram.com/p/B5LFTjNnlCS/

सोनियाबद्दल बोलायचे म्हणले तर तिने डीएव्ही कॉलेज अमृतसर येथून ग्रॅज्युएशन केले. तिच्या कारकीर्दीच्या सुरुवातीलाच, अनेक म्युझिक व्हिडिओंमध्ये ती दिसली आहे. याशिवाय तिने देशातील बर्‍याच भाषांच्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. फिल्मी करियरविषयी बोलायचे म्हणले तर तिने 2012 मध्ये ‘हाइड अँड सीक’ या मल्याळम चित्रपटातून आपल्या करिअरची सुरूवात केली होती.

https://www.instagram.com/p/B3tW-Rnnwxc/

त्यानंतर 2013 साली पंजाबी चित्रपट ‘हानि’, 2016 मधी ‘किले औल साल’, 2017 मध्ये ‘हृदयांतर’ चित्रपटात काम केले आहे. याशिवाय 2014 मध्ये तिने हिंदी चित्रपटातही काम केले आहे.

https://www.instagram.com/p/B0bvTAAH4LS/

ही अभिनेत्री आता ‘हॅरी हार्डी’ आणि ‘हीर’ च्या हिमेश रेशमियासोबत दिसणार आहे. हा चित्रपट तिच्या कारकिर्दीतील मोठ्या चित्रपटांमध्ये सामील झाला आहे यात शंका नाही. हा चित्रपट 31 जानेवारी 2020 रोजी प्रदर्शित होईल.

 

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/