#BirthdaySpecial : ‘सोनपरी’ मृणाल कुलकर्णीला अभिनयात नव्हता विशेष ‘रस’ ; ‘अशी’ झाली करिअरला सुरुवात

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – अभिनेत्री मृणाल कुलकर्णीने सोनपरी या मालिकेतून अनेकांची मने जिंकली आहेत. आज मृणाल कुलकर्णीचा वाढदिवस आहे. मृणाल कुलकर्णीचा जन्म 21 जून 1971 रोजी पु्ण्यात झाला आहे. मृणालने टीव्ही सीरीयलव्यतिरीक्त अनेक बॉलिवूड आणि मराठी सिनेमात काम केले आहे. लाँग टाईमपासून ती कोणत्या सिनेमात किंना सीरीयलमध्ये दिसली नाही. अनेकांना हे माहीत नसेल की, मृणाल सध्या काय करते.

मृणाल सध्या कोणत्याही सिनेमा किंवा मालिकेत दिसत नाही. तिने 2018 मध्ये शेवटचा सिनेमा केला. ये रे ये रे पैसा असे या सिनेमाचे नाव आहे. ग्रॅज्युएशनचे शिक्षण पूर्ण करून मृणालने तिचा मित्र रुचिर कुलकर्णीसोबत लग्नगाठ बांधली. सध्या ती सिनेमात दिसत नाही.

अशी झाली मृणालच्या करिअरला सुरुवात

वयाच्या 16 व्या वर्षीच मृणालने टीव्ही सीरीयल स्वामी मधून आपल्या अॅक्टींग करिअरला सुरुवात केली. या सीरीयलमध्ये तिने रमाबाई पेशवाचा रोल केला होता. तिला अभिनयात जास्त रुची नव्हती. तिला तिचे शिक्षण पूर्ण करायचे होते. परंतु तिला सतत अॅक्टींगसाठी ऑफर येत गेली आणि तिने 1994 साली अभिनयात करिअर करण्याचं ठरवलं.

मृणालने केलेल्या काही मालिका

मृणाल कुलकर्णीने अनेक मालिकेत काम केले आहे. तिने श्रीकांत, द ग्रेट मराठा, द्रौपदी, हसरतें, मीराबाई, टीचर, स्पर्श आणि सोनपरी अशा अनेक तिच्या मालिका सांगता येतील. याशिवाय तिने अनेक जाहिरातीतही काम केले आहे. त्यामुळेच तिला अनेक बॉलिवूड सिनेमात काम करण्याची संधी मिळाली आहे.

मृणालच्या बॉलिवूड सिनेमा आणि दिग्दर्शनाविषयी…

मृणाल कुलकर्णीने आशिक, कुठ मिठा हो जाए, मेड इन चायना आणि राम गोपल वर्मा यांच्या आग यांसारख्या बॉलिवूड सिनेमात काम केले आहे. याशिवाय तिने दिग्दर्शनही केले आहे. प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं हा तिने दिग्दर्शित केलेला पहिला मराठी सिनेमा आहे.