सोनपेठ तालुक्यात शिवप्रेमींकडून कन्नड सरकारचा निषेध

परभणी : पोलीसनामा ऑनलाईन  –   कर्नाटक राज्यातील बेळगाव जिल्ह्यातील हुक्केरी तालुक्यातील मनगुत्ती येथील मुख्य चौकातून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवल्याबद्दल संताप व्यक्त केला जात आहे. शुक्रवार रोजी च्या या घटनेने समस्त शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या गेल्याने संताप व्यक्त करून कर्नाटक सरकारचा निषेध केला जात आहे. परभणी जिल्ह्यातील सोनपेठ येथे शिवप्रेमी कडून तहसील प्रशासनाला निवेदन देण्यात आले आहे. सोमवारी देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कर्नाटक जिल्हा (बेळगाव) मनगुत्ती येथील चौकातून काढल्या जागी परत सन्मानपूर्वक छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारला जावा अशी मागणी करण्यात आली आहे.

अन्यथा मुख्यमंत्री येडियुरप्पा व कर्नाटक सरकार विरुद्ध तीव्र आंदोलन छेडण्यात येईल; असा इशारा सोमवारी 10 ऑगस्ट रोजी देण्यात आलेल्या निवेदनात दिला आहे. निवेदनावर मधुकर निरपणे, रंगनाथ रोडे, भगवान पायघन, कुमार चव्हाण, तुकाराम यादव, संतोष गवळी, कृष्ण पिंगळे, जनार्दन झिरपे, गोविंद चोरमले, गणेश लिंबटकर, आनंद गुजराथी, गणेश अन्नपूर्णे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.