दारूड्या बापाची परस्त्रीशी ‘संगत’, आजोबांच्या पाठिंब्यामुळं वडिल ‘डोईजड’ झाल्यानं मुलांनीच दोघांना ‘संपवलं’

नाशिक : पोलीसनामा ऑनलाईन – वडिल आणि आजोबाच्या हत्येचा तपास पोलिसांनी अवघ्या 4 तासांत लावला आणि तिघाही संशियत मुलांना ताब्यात घेतलं. रविवारी 5 वाजता त्यांना न्यायालयात हजर केले असता त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. घोटी खुर्द येथील ही घटना आहे.

पोटच्या 3 मुलांकडूनच वडिल अन आजोबांची हत्या
शुक्रवारी मध्यरात्री घोटी खुर्दमधील ज्ञानेश्वर फोकणे आणि काशीनाथ फोकणे अशा मुलगा आणि वडिलांचा खून झाला. घडलेल्या घटनेची माहिती घेतानाच पोलिसांनी ज्ञानेश्वर यांच्या 3 मुलांची स्वतंत्ररित्या चौकशी केली. कारण त्यांच्या देहबोलीत पोलिसांना संशय आला होता. एवढी मोठी घटना होऊनही त्यांच्या चेहऱ्यावर दु:ख नव्हते. शिवाय चौकशीतही विसंगती आढळून आली. पोलिसांनी कसून चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. ज्ञानेश्वर आणि वडिल काशिनाथ फोकणे यांच्यावर अंत्य संस्कार झाल्यानंतर रात्री दहाला पोलिसांनी तिघांनाही ताब्यात घेतलं.

म्हणून मुलांनी काढला वडिल-आजोबाचा काटा

वडिलांना दारूचे व्यसन होते. याशिवाय त्यांची परस्त्रीशी संगतही होती. त्यामुळे कर्जाचा डोंगर होत होता. यासाठी ते काही मिळकत विकण्याच्याही विचारात होते. मुलांनी त्यांना अनेकदा समजावलं होतं. पंरतु ते काही केल्या ऐकत नव्हते. आजोबांचाही त्यांना पाठिंबा होता. अखेर मुलांनी हतबल होत हे टोकाचं पाऊल टाकलं अशी माहिती तपासातून समोर आलं आहे.

धारदार शस्त्र आणि लोखंडी हत्यारानं हत्या

वडिल आणि आजोबा दोघांनाही दारूची सवय होती. शुक्रवारी रात्री सर्वांनी एकत्र जेवण केलं. दारु पिलेले वडिल आणि आजोबा शुद्धीत नव्हते. याचा फायदा घेत धारदार शस्त्र आणि लोखंडी हत्यारानं तिन्ही मुलांनी आजोबा-वडिलांची हत्या करण्यात आली. वाडीवऱ्हे पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस निरीक्षक जाधव याचा तपास करत आहेत.

दरवाजानं फोडलं बिंग
बंगल्याचा मुख्य दरवाजा पावसामुळं फुगला होता. त्यामुळे तो लागत नव्हता. सेफ्टी दरवाजावरच काम भागवले जात होते. दरवाजा हात घालून आतून कसा उघडायचा हे कुटुंबातच माहिती होतं. हा तर्क लावतच पोलीस आरोपीपर्यंत पोहोचले.

Visit : policenama.com

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like