पित्यासाठी पुत्राने केला ‘त्याग’, ‘इथं’ बदलला उमेदवार

नवी मुंबई : वृत्त संस्था – देशापेक्षा नवी मुंबईचे राजकारण कसे वेगळे आहे, याचा प्रत्यय यापूर्वी अनेकादा आला होता. आता तो निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा आला आहे. राजकारणात आपले बस्तान बसल्यानंतर अनेक राजकीय नेते आपल्या पुत्रांचे मार्गी लावून देण्याच्या तयारीत आहेत. आपले पुत्र, मुलगी, सून, जावई, पत्नी यांना तिकीट मिळावे यासाठी गेले काही महिने पक्षश्रेष्ठीचे उंबरठे झिजवत आहेत. त्यात अनेकांना यशही आले आहे. ज्याप्रमाणे पित्याने दिलेल्या वचनामुळे राम राज्य त्याग करुन वनवासात जातो, तसाच काहीसा प्रकार नवी मुंबईमध्ये घडला आहे.

एरोली विधानसभा मतदारसंघातून भाजपाने संदीप नाईक यांना उमेदवारी जाहीर केली. मात्र, गणेश नाईक यांना बेलापूरमधून उमेदवारी देण्याऐवजी विद्यमान आमदार मंदा म्हात्रे यांनाच उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे नवी मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपामध्ये सहभागी झालेल्या सर्व नगरसेवकांची बैठक झाली़ त्या बैठकीत स्वत: संदीप नाईक यांनी आपल्याऐवजी गणेश नाईक यांना उमेदवारी द्यावी, असा ठराव मांडला. त्याला सर्व नगरसेवकांनी पाठिंबा दिला.

त्यानंतर लगेचच कोकण विभागीय संघटन मंत्री सतीश धोंडे यांनी वरिष्ठांना याची माहिती दिली. त्यानंतर काही वेळातच सुत्रे हलली. त्यानंतर संदीप नाईक, माजी खासदार संजीव नाईक, जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत यांच्या उपस्थितीत गणेश नाईक यांना ए बी फॉर्म देण्यात आला.

एकीकडे पुत्रासाठी पिता झटत असताना चक्क पुत्राला त्याग करावा लागला आहे. नवी मुंबईचे राजकारण वेगळे आहे म्हणतात, ते खरे आहे.

Visit : Policenama.com

तुमच्या मुलांच्या डोळ्यांची अशी घ्या काळजी, उपाय जाणून घ्या
जाणून घ्या ‘सेक्शुअल लाइफ’ असंतुष्ट असण्याची कारणे, अशी घ्या काळजी
चिंच आहे बहुगुणी, उन्हाचा कडाका वाढला तर आवश्य खा

शरीरात ‘या’ ठिकाणी लपतो ‘एड्स’चा व्हायरस, संशोधकांनी केला दावा
मधुमेहाचे औषध स्तनाच्या कॅन्सरवर उपयुक्त, चिनी संशोधकांचे मत
मुलांना कोणत्या वयात शाळेत घालावे? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत
ऑफिसमध्ये जेवण करताना घ्यावी ‘ही’ काळजी, तुमच्यासाठी ठरु शकते फायदेशीर
नाभीवर लावा २ थेंब दारु, दूर होतील पीरियड्ससंबंधीत ‘या’ समस्या, जाणून घ्या