Sonu Nigam | गायक सोनू निगम यांच्या वडिलांच्या घरातून चोरलेले पैसे कोल्हापूरमध्ये जप्त

Sonu Nigam | 72 lakh rupees was stolen from singer sonu nigams fathers house
file photo

पोलीसनामा ऑनलाइन टीम – काही दिवसांपूर्वी एका कॉन्सर्टमध्ये धक्काबुक्की झाल्यामुळे गायक सोनू निगम (Sonu Nigam) हा चर्चेत होता. आता त्यानंतर पुन्हा एकदा तो चर्चेत आला आहे. सोनू निगम (Sonu Nigam) यांचे वडील अगमकुमार यांच्या ओशिवरा येथील बंगल्यातून 72 लाखांची चोरी (Theft) झाली होती. ही चोरी करणारा तरुण कोल्हापूर (Kolhapur) येथे वास्तव्यास असल्याचे समोर आले आहे. या तरुणाचे नाव रमजान मुजावर उर्फ रेहान (Ramjan Mujavar) असल्याचे उघड झाले आहे. संशयित आरोपीच्या घरावर छापा टाकून ओशिवरा पोलिसांनी रोकड हस्तगत केल्याची चर्चा सुरू आहे. मात्र अद्याप तर या वृत्तास अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.

 

काही दिवसांपूर्वी गायक सोनू निगम (Sonu Nigam) यांच्या वडीलाच्या घरातून 72 लाखांच्या रक्कमेची चोरी झाल्याचे समोर आले आहे. यावेळी सोनूची बहीण निकिता हिने या संपूर्ण प्रकरणी ओशिवरा पोलीस ठाण्यात (Oshiwara Police Station) अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

 

या संपूर्ण घटनेचा तपास करत असताना पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज पाहिले असता यामध्ये अगमकुमार
यांच्याकडे चालक म्हणून रमजान मुजावर उर्फ रेहान हा काम करत होता.
याच्यावर संशय घेत ओशिवरा पोलिसांनी गुरुवारी त्याला मुंबईतून ताब्यात घेतले.
यावेळी पोलिसांनी चौकशी दरम्यान त्याच्यावर प्रश्नांचा भडिमार केला आहे.

 

Web Title :- Sonu Nigam | 72 lakh rupees was stolen from singer sonu nigams fathers house

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

MLA Dada Bhuse | उद्धव ठाकरेंच्या सभेपूर्वीच दादा भुसेंचा इशारा, म्हणाले-‘जास्तीचं खोटं बोलले तर…’

Devendra Fadnavis | ‘अली जनाब उद्धव ठाकरेंना भूषणावह वाटतं का?’, मालेगावातील बॅनरवरुन देवेंद्र फडणवीसांचा टोला (व्हिडिओ)

Uddhav Thackeray Rally in Malegaon | उद्धव ठाकरेंच्या सभेपूर्वी एकनाथ शिंदेचा धक्का, 3 माजी नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा शिंदे गटात प्रवेश

Total
0
Shares
Related Posts
Satish Wagh Murder Case

Satish Wagh Murder Case | पुणे : आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांच्या पूर्वीच्या भाडेकरुने पाच महिन्यापूर्वी दिली होती सुपारी; पोलिसांच्या तपासात धक्कादायक माहिती आली समोर