‘माझा मुलगा गायक होणार नाही, झालाच तर तो भारतात तरी गाणं गाणार नाही’ : सोनू निगम

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   बॉलिवूड सिंगर सोनू निगम (Sonu Nigam) यानं त्याच्या मुलाच्या करिअरबद्दल मोठं विधान केलं आहे. माझा मुलगा निवान (Nivan) गायक होणार नाही. एवढंच नाही तर तो जर गायक झालाच तर किमान तो भारतात तरी गायक होणार नाही, असंही त्यानं स्पष्ट केलं आहे. सोनूचा मुलगा यूएईमध्ये आहे आणि गेमिंगमध्ये काम करत आहे. तो यूएईमधील अव्वल गेमर्सपैकी एक आहे.

निवानला गेमिंगमध्ये इंटरेस्ट

एका मुलाखतीत बोलताना 47 वर्षीय सोनू म्हणाला, खरं सांगायचं तर मला त्याला गायक बनवायचं नाही. यापुढे तो भारतातही फारसा राहणार नाही. तो दुबईत राहतो. मी त्याला आधीच भारतातून बाहेर काढलं आहे. तो जन्मजात गायक आहे, परंतु त्याला इतर गोष्टीत रस आहे.

सोनू पुढं म्हणतो, आता तो यूएईच्या सर्वाधिक लोकप्रिय गेमर्सपैकी एक आहे. निवानमध्ये अनेक सुप्त गुण आहेत. तो खूप बुद्धिमानही आहे. म्हणूनच त्यानं काय करावं हे मला त्याला सांगायचं नाही. त्याला काय करायचं आहे ते पाहूयात.

आय फॉर इंडियामध्ये गाताना दिसला निवान

जेव्हा निवान लहान होता तेव्हा तो अनेकदा सोनूसोबत स्टेजवर परफॉर्म करताना दिसला आहे. तो वडिलांसोबत रेकॉर्डिंग स्टुडिओतही जात असे. लॉकडाउनदरम्यान त्यानं सोनूसोबत एका ऑनलाईन कॉन्सर्टमध्येही गायलं आहे.

सोनूच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर कामचोर या सिनेमातून त्यानं बाल कलाकार म्हणून करिअरला सुरुवात केली होती. सनी देओलचा डेब्यू सिनेमा बेताबमध्येही त्यानं सनीच्या लहानपणीचा रोल केला होता. परंतु 2002 साली आलेल्या जानी दुश्मन- एक अनोखी कहानी या सिनेमातील रोल चाहत्यांच्या लक्षात आहे. हा एक मल्टीस्टारर सिनेमा आहे. सोनूनं नवरा माझा नवसाचा या मराठी सिनेमातही काम केलं आहे.

सोनूच्या सिंगिंग करिअरबद्दल बोलायचं झालं तर त्याचं सिंगिंग करिअर हे त्याच्या अ‍ॅक्टिंग करिअरपेक्षाही सफल राहिलं आहे. सोनूनं अनेक सिनेमासाठी हिट गाणी दिली आहेत. हिंदीव्यतिरिक्त सोनूनं प्रादेशिक भाषेतील सिनेमांसाठीही गाणी गायली आहेत.