Coronavirus : आपण इटलीकडून धडा शिकलोच नाही, सोनू निगम संतापला

पोलिसनामा ऑनलाईन टीम – कोरोनाचा हैदोस सुरु असताना’ अजूनही लोक मॉर्निंग वॉक, जॉगिंगसाठी घराबाहेर पडत आहेत. देश प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी करत आहे. यात भारतातही 21 दिवसांचा लॉकडाउन करण्यात आला आहे. मात्र अजूनही काही लोक या लॉकडाउनला गंभीररित्या घेताना दिसत नाहीत. त्यामुळे गायक सोनू निगमने संताप व्यक्त केला आहे. ‘इटलीकडून आपण धडा शिकलोच नाही. ही अत्यंत लाजिरवाणी बाब आहे’, अशा शब्दांत त्याने राग व्यक्त केला.

इतकी लोकसंख्या असलेल्या देशासाठी सध्या लॉकडाउन हाच सर्वोत्तम व गरजेचा पर्याय आहे. मी सध्या दुबईत आहे. पण बाबांनी मला सांगितलं की अजूनही भारतातील अनेक लोक मॉर्निंग वॉक, जॉगिंगसाठी बाहेर पडतात. दुकाने उघडी आहेत. लोक बाहेर सहज फेरफटका मारत आहेत. त्यामुळे इटलीला पाहून आपण धडा शिकलोच नाही असा संताप सोनू निगमने व्यक्त केला.

निगम सध्या त्यांच्या कुटुंबीयांसोबत दुबईत आहे. विमानांची उड्डाणे बंद केल्याने तो तिथेच अडकला आहे. मात्र सोशल मीडियाद्वारे तो चाहत्यांच्या संपर्कात आहे. लोकांना घरीच राहण्याचं आवाहनदेखील तो सोशल मीडियाद्वारे करत आहे.