हिंदू असल्याने म्हणू शकतो की, कुंभमेळा झाला नव्हता पाहिजे : सोनू निगम

नवी दिल्ली : वृत्त संस्था – देशात कोरोना व्हायरसचा कहर वाढत चालला आहे. रोज हजारो लोकांना संसर्ग होत आहे, अनेकांचा जीव जात आहे. त्यातच कुंभमेळ्यात हजारो जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यावर गायक सोनू निगमने चिंता व्यक्त केली आहे. सोनूने आपल्या घरात एक व्यक्ती आजारी असल्याचे सांगत म्हटले की, देश आणि डॉक्टर्सची स्थिती खुप वाईट आहे. यावर्षी कुंभमेळा झाला नव्हता पाहिजे.

सोनू निगमने रात्री 3 वाजता आपला व्हिडिओ ब्लॉग बनवून इंस्टाग्रामवर शेयर केला आहे. या व्हिडिओमध्ये सोनू म्हणतो की, मी इतरांच्या बाबतीत काही म्हणू शकत नाही, परंतु एक हिंदू असल्याच्या नात्याने हे आवश्य म्हणू शकतो की कुंभमेळा झाला नव्हता पाहिजे. परंतु, चांगली गोष्ट आहे की, थोडी अक्कल आली आहे आणि तो प्रतिकात्मक करण्यात आला आहे. मी श्रद्धा समजू शकतो परंतु मला वाटते की यावेळी लोकांना जीवनापेक्षा आणखी कशाचीही आवश्यक नाही.

सोनू म्हणतो, तुम्हाला असे वाटते का की आम्हाला शो करण्याची इच्छा होत नाही. परंतु मला वाटते की, शो झाले नाही पाहिजेत. एक गायक म्हणून हे मी बोलत आहे. कदाचित नंतर सोशल डिस्टेंसिंगवाले शो होऊ शकतात. परंतु सध्या स्थिती खुप जास्त बिकट आहे. आपण हे समजून घेतले पाहिजे. सोनू ने याबाबत सुद्धा म्हटले की, अस्वस्थ करणारी ही गोष्ट आहे की सव्वा वर्षापासून लोकांकडे काम नाही, परंतु कोरोनाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. याशिवाय त्याने हे सुद्धा सांगितले की, एक सिनियर आणि त्यांची पत्नी सुद्धा कोरोनाशी लढत आहेत.

एका स्टार्सने सुद्धा व्यक्त केली होती नाराजी
सोनू निगमच्या अगोदर अभिनेत्री मलायका अरोराने सुद्धा हरिद्वारमध्ये सुरू असलेल्या कुंभमेळ्यात उसळलेल्या गर्दीवर प्रतिक्रिया दिली होती. तिने इन्स्टाग्रामवर कुंभमेळ्याचा एक फोटो शेयर करून लिहिले की, हा महामारीचा काळ आहे परंतु हे शॉकिंग आहे. तसेच डायरेक्टर राम गोपाल वर्मा यांनी सुद्धा नाराजी व्यक्त करत म्हटले होते की, लोक आपले कर्म धुण्यासाठी गंगेत डुबकी मारतात आणि त्यांना आशीर्वादात कोरोना मिळत आहे.