निलेश राणेंच्या ‘त्या’ वक्तव्यावर सोनू निगमने दिली ‘ही’ प्रतिक्रिया

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – नारायण राणे यांचे पुत्र आणि महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते निलेश राणे यांनी काही दिवसांपूर्वी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर सनसनाटी आरोप केले होते. त्यामुळे माध्यमांमध्ये पुन्हा सोनू निगम हे नाव आले. नुकतेच एका कार्यक्रमात या विषयी सोनू निगम ला विचारण्यात आले तेव्हा मात्र सोनू निगमने चेहऱ्यावर आगळे वेगळे भाव आणत पत्रकाराकडे पाहिलं. निलेश राणे यांनी बाळासाहेबांनी गायक सोनू निगमच्या हत्येचा कट रचला होता असा आरोप केला आहे.
प्रसारमाध्यमांशी संवाद साधत असताना पत्रकाराने सोनू निगमला निलेश राणेंनी केलेल्या वक्तव्याबद्दल विचारलं. यावर सोनू निगमने काही उत्तर दिलं नाही मात्र चेहरा वेडावाकडा करत पत्रकाराकडे पाहिलं आणि एक स्मितहास्य दिलं. सोनू निगमने दिलेल्या या प्रतिक्रियेमुळे नेमकं त्याचं उत्तर होतं की नाही हे समजू शकलं नाही.
काय म्हणाले निलेश राणे
बाळासाहेब ठाकरेंना सुप्रसिद्ध गायक सोनू निगमलाही ठार मारायचे होते. सोनू निगमला ठार मारायचे अनेकवेळा प्रयत्नही झाले. असे आरोप निलेश राणे यांनी केले. इतकेच नव्हे तर, सोनू निगमला तुम्ही विचारा, बाळासाहेबांच्या सांगण्यावरुन कुठे कुठे त्यांना ठार मारायला शिवसैनिक गेले होते. आज ते सांगतीलही. कदाचित घाबरले असतील, मात्र, आज बाळासाहेब नाहीत, तर सांगतीलही. असेही ते म्हणले. याचबरोबर सोनू निगमचे आणि ठाकरे घराण्याचे काय नाते होते हे मला सांगायला लावू नका. असेही ते म्हणाले.शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या हत्येचा कट पूर्वनियोजित होता, मात्र बाळासाहेब ठाकरेंनी त्यांचा रुग्णालयात मृत्यू झाल्याचे भासवले असा घणाघाती आरोप निलेश राणे यांनी केला होता.
इतकेच नव्हे तर जर माझे तोंड उघडायला लावाले,  तर बाळासाहेब ठाकरेंच्या कर्जतच्या फार्म हाऊसवर कुणा-कुणाचे मृत्यू झाले.  कोण कोण गेले होते कर्जतच्या फार्म हाऊसवर. हे सगळे मी जाहीर सभे मध्ये सांगेन.असेही ते म्हंटले. याचबरोबर आमच्या नादाला लागायचे नाही. राणे म्हणतात आम्हाला…! असेही ते म्हणाले. तसेच बाळासाहेबांबद्दल आजपर्यंत राणेसाहेब कधीही बोलले नाहीत. आम्हाला बाळासाहेबांचा मानसन्मान आहे. आणि त्यांचा मानसन्मान ठेवलाच पाहिजे. मात्र राणेसाहेबांबदल बाळासाहेब बोलत होते, ते आम्हाला चालत होते. आम्हाला काही फरकही पडत नव्हता. मात्र राणेसाहेबांबद्दल गल्लीबोळातले गटरछाप (विनायक राऊत) नेते बोलायला लागले, तर आम्ही सहन करणार नाहीत. असेही ते म्हणाले होते.