खरंच सोनू निगमला कोणत्या राजकीय पक्षाकडून ऑफर आली होती का ?

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – बॉलीवूडचा प्रसिद्ध गायक सोनू निगम त्याच्या वक्तव्यमुळे सध्या खूप चर्चेत आहे. चित्रपट आणि गाण्याव्यतिरिक्त, देशाच्या राजकीय आणि सामाजिक समस्यांबद्दल तो फीडबॅक देखील देतो. एवढेच नव्हे तर सोनू सामाजिक-संबंधित संस्थांचे दानही करतो.

दरम्यान त्याला राजकारणात येण्यासाठी काही प्रश्न विचारले आणि त्याने त्यावर वेगळ्याच अंदाजात उत्तर दिले. नुकताच जेव्हा त्याला मीडियाने विचारलं की तुझा मनात राजकारणात सामील होण्याची कल्पना आहे की नाही, तो म्हणाला, “नाही, मी आता राजकारणासाठी तयार नाही, तेव्हा मी या ऑफरचा अस्वीकार केला आणि उत्तर दिले.

सोनू निगमने मीडियासोबत बोलत असतांना कुठल्याही राजकीय पक्षाचे नाव घेतले नाही. त्याने दिलेल्या उत्तरामुळे मीडियामध्ये चर्चा चालू झाल्या की त्याला कोणत्या राजकीय पक्षाने ऑफर केली होती. त्याने नरेंद्र मोदींना पीएम झाल्याबद्दल शुभेच्या दिल्या. त्याच्या कामा बद्दल बोलायचे गेले तर आताच प्रदर्शित झालेली ‘पीएम नरेंद्र मोदी’ या चित्रपटामध्ये गाणं गायलं आहे. आताच झालेल्या जम्मू-कश्मीरच्या पुलवामा मध्ये झालेल्या आतंकी हल्यावर बोला. पत्रकारांशी बोलत असतांना सांगितलं कि हल्ल्यानंतर सोशल मीडियावर खूप लोक भारताला पाकिस्तान सोबत युद्धच्या गोष्टी करत आहे. लोक फक्त युद्धच्या गोष्टी करता पण आर्मी मध्ये कोणी जाऊ इच्छित नाहीये.

त्यांनी पुढे म्हटले की जे लोक भारत आणि पाकिस्तान युद्धविषयी बोलतात त्यांना युद्ध कसे आहे हे माहित नाही. त्यांना हे माहित नाही की ते खूप लांब जाऊ शकते. युद्ध हे फक्त सीमेवरच होत नव्हे तर ते आपल्या पर्यंत देखील येऊ शकते. जर युद्ध झाले तर वस्तूंचे भाव वाढू शकते. त्यानंतर लोक म्हणतील की सरकारने भाव वाढवले लढाई सोपी नसते.