Sonu Nigam | बॉयकॉट बॉलिवूडबाबत सोनू निगमचं मोठं वक्तव्य

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Sonu Nigam | सुप्रसिद्ध गायक सोनू निगम नेहमीच चर्चेत असतो. सोनू निगमने आजवर आपल्या आवाजाने प्रेक्षकांना भुरळ पाडली आहे. सोनू निगम त्याच्या व्यावसायिक आयुष्याव्यतिरिक्त खाजगी आयुष्यामुळे देखील चर्चेत असतो. मात्र बऱ्याचदा सोनू निगम त्याच्या वक्तव्यामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकलेला ही दिसून येतो. सोनुला बॉलीवूडमधील बहुचर्चित बॉयकॉट बॉलीवूड ट्रेंडवर विचारले असता त्यांनी आपले मत स्पष्ट केले आहे. (Sonu Nigam)

 

उत्तर प्रदेशला चित्रपटांसाठी सर्वात अनुकूल राज्य प्रसारित करण्यासाठी सध्या उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ मुंबई दौऱ्यावर आहेत. यावेळी अनेक बॉलीवूड अभिनेत्यांनी त्यांची भेट घेतली. यामध्ये सुनील शेट्टी पासून राजपाल यादव दिग्दर्शक सुभाष घई, बोनी कपूर हे देखील उपस्थित होते. यावेळी गायक सोनू निगम देखील उपस्थित होते. यावेळी झालेल्या मुलाखतीत त्यांनी त्याचे मत स्पष्ट केले आहे. (Sonu Nigam)

गेल्या अनेक दिवसांपासून बॉक्स ऑफिसवर बॉलीवूड चित्रपटांपेक्षा साउथ चित्रपट आपली खेळी दाखवण्यात यशस्वी होत आहेत. तर बॉलीवूड चित्रपटांवर बहिष्कार टाकण्याची मागणी प्रेक्षक अनेक दिवसांपासून करत आहेत. यामुळे अनेक बिग बजेट चित्रपटांना मोठा फटका बसला आहे. या बॉयकॉट बॉलिवूड मुळे अक्षय कुमार पासून ते आमिर खान पर्यंत सर्वच कलाकारांना फ्लॉपचा सामना करावा लागला आहे. यावर सोनू निगमला विचारले असता सोनू निगम म्हणाला, “मी फालतू लोकांसाठी का बोलू? काही कळतच नसेल तर मी बोलून काही उपयोग नाही. प्रत्येकाने आपली मान खाली घालून चालणे गरजेचे आहे. सोशल मीडिया आणि कलाकार या दोन्ही बाजू सोबत घेऊन चालता येणे महत्त्वाचे आहे” असे म्हणत सोनू निगमने जणू बॉलीवूड कलाकारांना फटकारले आहे.

 

सोनू निगमला ‘पठाण’ चित्रपटाबाबत विचारले असता त्यांनी यावर कमेंट करण्यास नकार दिला.
यानंतर सोनुला उत्तर प्रदेश फिल्म इंडस्ट्रीला आपल्या मुठीत घेईल का? यावर तुम्हाला काय वाटते असे विचारले असता सोनू म्हणाला, “माझे कुटुंब उत्तर प्रदेश मधील आहे.
जर उत्तर प्रदेश मध्ये फिल्म इंडस्ट्रीज सुरु होत असेल तर खूपच चांगली गोष्ट आहे. त्या ठिकाणी शांती आणि समृद्धी आहे.
मात्र मुंबई ही आपली आई आहे. मुंबईने आपल्याला कष्ट करायला लढायला शिकवलेले आहे.
कशा पद्धतीने काम करायचे हे देखील मुंबईने शिकवले आहे”.

 

Web Title :- Sonu Nigam | sonu nigam told about boycott bollywood trend see report

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Rakul Preet Singh | अभिनेत्री रकुल प्रीत सिंह निळ्या ड्रेसमध्ये दिसत आहे एकदम झक्कास; फोटो व्हायरल

Pune News | सामाजिक, राजकीय गुन्हे मागे घेण्याचे पोलिस आयुक्त रितेश कुमार यांचे कॉँग्रेस शिष्टमंडळाला आश्वासन

Smita Gondkar | अभिनेत्री स्मिता गोंदकरच्या हॉट आणि सेक्सी फोटोजने वाढवले सोशल मीडियाचे तापमान