‘क्या हुआ तेरा वादा’ पासून सोनू निगमच्या गायनाची सुरुवात

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

संगीत क्षेत्रात अनेक कलाकार आहेत पण गेल्या अनेक दशकापासून आपल्या सुमधूर आवाजाने श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणारा गायक सोनू निगम याची लोकप्रियता आजही कायम आहे. सोनूने गायलेलं प्रत्येक गाणं श्रोत्यांच्या मनाचा ठाव घेताना दिसतं.त्याच गाणं लोकांच्या मनामनात भिनल जात. त्यामुळे त्याची लोकप्रियता इतरांपेक्षा नेहमी जास्त आहे , यशस्वी गायक म्हणून प्रसिद्ध झालेला सोनू निगम ने आपल्या करियर साठीची सुरुवात अगदी लहानपणीच सुरु केली होती. विशेष म्हणजे आज यशाचं शिखरं सर केलेल्या सोनूने त्याच्या गायकीची सुरुवात लग्नसमारंभामध्ये गाऊन केल्याचं समोर आलं आहे.

सोनू निगम यांचा जन्म फरिदाबाद येथे झाला. सोनूला लहानपणापासूनच गायनाचा वारसा लाभला होता. त्यामळे त्याला गायनाची आवड निर्माण झाली . सोनूचे वडीलदेखील लहान-मोठ्या समारंभामध्ये गाणं गात असतं. त्याचाच परिणाम सोनूवर झाला आणि त्याच्या लहान वयातच त्याला गायनाची आवड निर्माण झाली. यातून रोज गायनाचा सराव करत सोनूने त्याच्या वडीलाबरोबर गाण्याच्या कार्यक्रमांना हजेरी लावण्यास सुरुवात केली. त्यानंतर हळूहळू तोदेखील वडीलांची साथ देत लग्नसमारंभात गाणी गाऊ लागला. सोनूने त्याचं पहिलं गाणं वयाच्या चौथ्या वर्षी एका लग्नात गायलं आणि तिथूनच त्याच्या गायनाची खऱ्या अर्थाने सुरुवात झाली.
[amazon_link asins=’B07F66CQXF’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’48a88d60-93cb-11e8-84d9-b57f9c489b6a’]
लहानपणापासूनच वडीलांबरोबर गाणी म्हणणाऱ्या सोनूने एका लग्नाला मोहम्द रफी यांचे ‘क्या हुआ तेरा वादा’ हे गाणं गायलं होत. त्या दिवसापासून त्याच्या गायनाची खऱ्या अर्थाने सुरुवात केली. विशेष म्हणजे त्याचं हे गाणं उपस्थित साऱ्यांच्याच पसंतीत पडतआणि सारे जण त्याला भरभरून प्रतिसाद देत तेव्हा पासून लोकांचा हा प्रतिसाद पाहून सोनूने गायक व्हायचं पहिलं स्वप्न पाहिलं आणि येथून त्याच्या कारकिर्दीची सुरुवात झाली.

गायक व्हायचं स्वप्न उराशी बाळगून सोनूने वयाच्या १९ व्या वर्षी मुंबई गाठली आणि संघर्ष करत आज गायनक्षेत्रातील एक महत्वाची व्यक्ती म्हणून स्थान मिळवलं. सोनूने त्याच्या कारकिर्दीमध्ये अनेक सुपरहिट चित्रपटांना आपला आवाज दिला असून त्याचं प्रत्येक गाणं हिट ठरलेलं आज सोनूचा ४५ वा वाढदिवस आहे. आहे.अनेक वेगवेगळ्या भाषेतील गाणी त्याने गायली आहेत. सोनू निगम यांना अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. सगळीकडून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.