सेक्स रॅकेट ‘क्वीन’ सोनू पंजाबन : ‘पैसा’ आणि ‘पावर’च्या मोहासाठी उभी केली ‘कॉल गर्ल्स’ कंपनी, जाणून घ्या क्राइम ‘कुंडली’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – तिचे नाव पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. खरंतर तिलाच निनावीपणा आवडत नाही. तिच्या कर्मांचा हिशेब होणे अजून बाकी आहे. तिचे हे कर्मच तिची ओळख आहे. ती जे काही करते, ते चर्चेत येते. आम्ही सांगत आहोत, देहव्यापारात नाव कमावलेल्या सोनू पंजाबन बद्दल. तिने पुन्हा एकदा विष प्राशन केले आहे. असे प्रथमच झालेले नाही. मोक्कामध्ये अटक असतानाही तिने जेलमध्ये गळफास लावून घेण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हा तिला वाचवण्यात आले होते.

सध्या सोनू पंजाबन प्रथमच एका केसमध्ये दोषी आढळली आहे. दिल्लीच्या द्वारका कोर्टाने सोनू आणि तिचा साथीदार संदीपला एका 12 वर्षाच्या मुलीचे अपहरण, रेप आणि जबरदस्तीने देहविक्रीच्या धंद्यात ढकलल्याच्या आरोपाखाली दोषी ठरवले आहे.

सोनू पंजाबनची ही कहानी जुनी आहे. तिला पैसा आणि पावरची प्रचंड लालसा आहे. ती पूर्ण करण्यासाठी तिने जगातील सर्वात जुना धंदा निवडला, परंतु या धंद्याचे रूप बदलून त्याला तिने कंपनीत रूपांतरीत केले. असे म्हटले जाते की, घरे सुरक्षित राहावीत यासाठी वेश्यालय सुरू राहणे जरूरी आहे. परंतु, बदलत्या काळाबरोबर वेश्यालयांचे महत्व कमी झाले. उदारीकरणानंतर एक असे युग आले, ज्यामध्ये कमी वेळात सर्वकाही मिळवण्याची इच्छा तरूणांमध्ये उसळी घेऊ लागली. काही ईमानदारीने आपले लक्ष्य गाठण्यासाठी प्रयत्न करू लागले तर काही लोकांनी शॉर्टकटचा मार्ग अवलंबला. सोनू पंजाबन सारख्या लोकांनी या स्थितीचा पूर्ण फायदा उचलला.

10 वी पास सोनू पंजाबनने एक सेक्स रॅकेट तयार केले, यामध्ये लोकांना कामाचे वाटत केले होते. मुलींना धंद्यात आणणे, त्यांना हाय प्रोफाईल लोकांपर्यंत पोहचवणे, क्लाएंट शोधणे आणि त्यांना मुली सप्लाय करण्याची वेगवेगळ्या लोकांची जबाबदारी होती. यामध्ये इन्व्हेस्टमेंट होती, पण कमाईसुद्धा होती. डिमांड आणि सप्लायच्या खेळात सोनू पंजाबनने अमाप संपत्ती कमावली. दिल्ली-हरियाणामध्ये तिने अनेक ठिकाणी संपत्ती खरेदी केली आहे.

असे फसवले जात होते मुलींना
मुलींना देहव्यापारात आणण्यासाठी सोनू पंजाबनने काही लोकांना कामावर ठेवले होते. त्यांचा पगार 25000 पासून 75000 रुपये महिना होता. या लोकांचे काम होते, पब आणि बारमध्ये जाणे आणि अशा मुलींचा शोध घेणे ज्यांना या धंद्यात येण्याची इच्छा आहे. ज्या मुलींची आर्थिकस्थिती खुप चांगी नाही, पण त्यांच्या एखाद्या मित्राने येथे पार्टी दिली आहे, एखाद्या मित्राचा वाढदिवस आहे यासाठी ती आली, परंतु तिला येथे चांगले वाटले. महागडे कपडे आणि महागडे फोन त्यांना आकर्षित करत होते. ज्या लांबलचक गाड्या लालसेच्या नजरेने पाहत होत्या. सोनू पंजाबनच्या पेरोलवरील मुले-मुली अशाप्रकारच्या मुलींचा शोध घेत असत. प्रथम अशा मुलींशी एखादा बहाणाकरून दोस्ती केली जात असे. नंतर त्यांना स्वप्न दाखवले जात असे. त्यांचा ब्रेनवॉश केला जात असे, त्यांना त्यांच्या देहाची किंमत सांगितली जात असे, त्यांना समजावले जात असे की, या धंद्याचे वय जास्त नसते. त्यांना सांगितले जात होते की, एकदा करून बघ, दुसर्‍यावेळी त्रास देणार नाही आणि नंतर हळुहळु त्यांना या चिखलात उरवले जात होते.

डिमांड आणि सप्लायचा खेळ
सोनू पंजाबनचा धंदा जोरात सुरू होता, डिमांड वाढत चालली होती. याच वेगाने सोनूची फी सुद्धा वाढत होती. 10वी पास सोनू पंजाबनने टीव्ही अ‍ॅक्ट्रेसपासून एयरहोस्टेसपर्यंत, मॉडल्सपासून शाळा-कॉलेजला जाणार्‍या मुलींपर्यंतच्या मुलींना आपल्या रॅकेटमध्ये ओढले. परंतु, खर्‍या शिकार तर त्या निष्पाप मुली होत्या, ज्या किरकोळ गरजांसाठी या रॅकेटमध्ये फसल्या होत्या. असे नव्हते की, पोलिसांना सोनू पंजाबनच्या या धंद्याची माहिती नव्हती, परंतु त्यांना ठोस पुरावे मिळत नव्हते. जाणकारांचे म्हणणे आहे की, सोनू मोठे नोकरशाह, नेते, उद्योगांशी संबंधीत लोकांना मुली पुरवत होती, ज्यामुळे पोलीस तिच्यावर हात टाकायला कचरत होते.

इकडे तिची कृत्य वाढत चालली होती. हाता तिची टोळी देहव्यापराच्या पुढे जाऊन निष्पाप मुलींच्या खरेदी-विक्रीत सहभागी झाली. सोनू पंजाबनला 2007मध्ये प्रीत विहार पोलिसांनी आणि 2008 मध्ये साकेत पोलिसांनी अटक केली होती, परंतु ती जामीनावर सुटून बाहेर आली आणि पुन्हा आपली कंपनी चालवू लागली. एवढेच नव्हे, जेलमध्ये असतानाही तिच्या धंद्यावर कोणताही परिणाम झाला नव्हता.

जेव्हा सोनूवर लागला मोक्का
पोलीस हतबल होते की दुर्लक्ष करत होते, हे स्पष्ट सांगता येत नाही. कारण पोलिसांकडे तक्रारी येत होत्या, परंतु साक्षीदार मिळत नव्हते. अखेर एप्रिल 2011मध्ये सोनू पंजाबनला 4 मुली आणि 4 मुलांसोबत अटक करण्यात आले. यावेळी तिच्यावर मोक्का (महाराष्ट्र कंट्रोल ऑफ ऑर्गनाईज्ड क्राइम अ‍ॅक्ट 1999) लावण्यात आला. पोलिसांनुसार पैसा कमावण्यासाठी ती संघटीत पद्धतीने सेक्स रॅकेट चालवत होती. परंतु, पोलीस आरोप सिद्ध करू शकले नाहीत आणि सोनू पंजाबन मोक्कामधून सुटली.

कोणत्या प्रकरणात दोषी आढळली सोनू
प्रकरण 2009 चे आहे. एका मुलीने पोलिसांना जी कहानी सांगितली त्यावरून 2006मध्ये ती 12 वर्षांची होती, जेव्हा ती इयत्ता सहावीत होती तेव्हा तिची ओळख संदीप नावाच्या व्यक्तीशी झाली. ही मैत्री पुढे वाढत गेली. संदीपने तिला लग्न करण्याचे खोटे आश्वासन दिले आणि दिल्लीत घेऊन जाऊन तिच्यावर रेप केला. संदीपने या मुलीला वेगवेगळ्या लोकांना 10 वेळा विकले. यानंतर या मुलीला सोनू पंजाबनकडे सोपवले. सोनूने तिला जबरदस्तीने देहविक्रीच्या धंद्यात ढकलले. तिला नशेची इंजेक्शन देण्यात आली आणि दिल्ली-हरयाणा-पंजाबमध्ये तिला अनेक लोकांच्या हवाली केले. नंतर सतपाल नावाच्या व्यक्तीशी तिचे जबरदस्तीने लग्न लावून दिले. ही मुलगी कशीतरी त्यांच्या तावडीतून पळून जाऊन नजफगढ पोलीस ठाण्यात पोहचली आणि आपल्याबाबत घडलेला प्रकार तिने ऐकवला. 2009 मध्ये सोनू पंजाबन आणि तिच्या साथीदाराविरोधात केस दाखल झाली.

केंद्रीय मंत्र्याला ब्लॅकमेल करण्याचा कट
डिसेंबर 2017 मध्ये सोनू पंजाबनला अटक करण्यात आली, आरोप होता की, तिने एका केंद्रीय मंत्र्याला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला आणि एका मुलीला 20 लाख रूपयात विकले. जेव्हा सोनूला पकडून पोलीस ठाण्यात आणण्यात आले, तेव्हा तिने खुप गोंधळ घातला. तिने पोलिसांना धमकी दिली की, तुम्ही मला ओळखत नाही. माझी ओळख वरपर्यंत आहे. परंतु, सोनूची ही चाल यशस्वी झाली नाही तेव्हा तिने कमला मार्केट पोलीस ठाण्यात म्हटले की, जर तिला जेलमध्ये टाकले तर जेलच्या सळ्यांवर आपटून डोके फोडून घेईन.

अपहृत मुलगी नंतर आपल्या घरी परतली होती. तिने पोलिसांना सांगितले होते की, 3 मुलांनी तिचे घराच्या बाहेर अपहरण केले होते आणि एका महिलेकडे सोपवले होते, मुलीला फोटो दाखवल्यानंतर ती महिला सोनू पंजाबन असल्याचे समजले. मुलीने सांगितले की, तिच्याकडून जबरदस्तीने देहव्यापार करून घेण्यात आला आणि नंतर लखनऊच्या व्यक्तीने तिच्याशी लग्न केले. 6 महिन्यानंतर तो आपल्या मित्रांसाठी तिला वापरून घेऊ लागला. जेव्हा ती गरोदर राहीली तेव्हा तिला अबॉर्शनसाठी हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले, तेथून संधी पाहून ती निसटली.

सोनूचा रोहतक ते दिल्लीचा प्रवास
रोहतकमध्ये राहाणार्‍या गीता अरोडाचे वडील रोजगाराच्या शोधात दिल्लीत आले होते. ते ऑटो रिक्षा चालवत होते. 10वी पास केल्यानंतर तिने ब्यूटी पार्लर उघडले होते. 17 वर्षाच्या वयात तिचा विवाह विजय सिंहसोबत झाला, तो एक हिस्ट्रीशीटर होता. श्रीप्रकाश शुक्लाशी त्याचे संबंध असल्याचे म्हटले जात होते. 2003 मध्ये युपी एसटीएफने त्याला ठार केले. यामुळे गीताला पैशांची चणचण भासू लागली. ब्यूटी पॉर्लरच्या कमाईतून घर चालत नव्हते, आणि महत्वकांक्षासुद्धा पुरी होत नव्हती. परिस्थिती अशी बदलली की, ती कॉलगर्ल बनली. विजय सिंहसोबत राहिल्याने तिला पावरचे महत्व माहित होते.

सोनू ब्रदर्सच्या आश्रयात, अशी बनली सोनू पंजाबन
2003-04 च्या सुमारस दीपक सोनू आणि हेमंत सोनू गुन्हेगारी जगतातील मोठी नावे होती. त्यांच्यावर अपहरण आणि खंडणीची अनेक प्रकरणे दाखल होती. गीता अरोडाला समजले की जर पुढे जायचे असेल तर अशा लोकांच्या आश्रयाला गेल्यास पुढील वाट मोकळी होऊ शकते. ती सोनू ब्रदर्सच्या आश्रयाला गेली आणि दीपक सोनूसोबत तिने लग्न केले. परंतु, हे लग्न जास्त दिवस टिकले नाही. 2004मध्ये दीपक पोलिसांच्या चकमकीत मारला गेला. यानंतर गीताने त्याचा छोटा भाऊ हेमंत सोनूसोबत लग्न केले. परंतु हेमंतशी गीताने लग्न केल्यानंतर तो सुद्धा 2006मध्ये एका एन्काऊंटरमध्ये मारला गेला.

न उलगडलेली रहस्य
असे म्हटले जाते की, सोनू पंजाबनने त्याच्याशी लग्न केले जो गुन्हेगारी जगतात मोठा होता. याच गुन्हेगारांच्या बळावर तिने आपले काळेधंदे उभे केले आणि तिच्याच फसवणुकीमुळे ते मारले गेले. परंतु, हे सिद्ध झालेले नाही. परंतु, हेमंत सोनूमुळे गीता अरोडा सर्वाधिक प्रभावित होती आणि त्याच्या एन्काऊंटरनंतर तिने आपले नाव सोनू ठेवले, पुढे पंजाबन जोडले. अशाप्रकारे दिल्लीला मिळाली सोनू पंजाबन. तिच्यावर एक चित्रपटही बनवण्यात आला होता, ज्याचे नाव फुकरे होते, ज्यामध्ये सोनू पंजाबनचे कॅरेक्टर होते आणि या कॅरेक्टरचे नाव होते भोली पंजाबन.

दबंग पंजाबन
सोनू पंजाबनशी ज्यांची भेट झाली आहे ते सांगतात की, तिच्या व्यक्तिमत्वात अजब बिनधास्तपणा आहे. भोळ्या चेहर्‍याच्या मागे लबाड मेंदू काम करत असतो. तिला निष्पापणे बोलणे जमते आणि गरज पडल्यास ती शेलक्या शिव्यांचा भडीमारसुद्धा करते. तिला कुणाची भिती वाटत नाही. पोलिसांची भिती तर अजिबात वाटत नाही. असे म्हटले जाते की, पहिल्या अटकेची वेळ सोडली तर तिने कधीही पोलिसांसमोर गयावया केली नाही. उलट नखरे आणि नाटक करून पोलिसांच्या नाकीनऊ आणले. सध्या तिच्या गुन्ह्यांचा हिशेब बाकी आहे.