लवकरच येतंय सोनू सूदचं नवं पुस्तक, कव्हर पेज व्हायरल ! ‘या’ दिवशी प्रकाशित होणार

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   कोरोना व्हायरस लॉकडाऊनमध्ये (COVID-19 pandemic Lockdown) सतत लोकांची मदत करणारा बॉलिवूड अभिनेता सोनू सूद (Sonu Sood) अजूनही चर्चेत आहे. या सकंटकाळात अनेक ठिकाणी अडकलेल्या लोकांची तो सतत मदत करताना दिसला होता. पडद्यावरील हा खलनायक रिअल लाईफ सुपरहिरो ठरताना दिसला. अनेक गरिबांना, बेरोजगारांना, विद्यार्थ्यांनाही त्यानं मदत केली. यावेळी सोनूला आलेले विविध अनुभव तो एका पुस्तकातून लोकांना सांगणार आहे.

सोनू सूद याचं एक नवं पुस्तक लवकरच प्रेक्षकांच्या आणि वाचकांच्या भेटील येणार आहे. आय अ‍ॅम नो मसिहा (I am No Messiah) असं या पुस्तकाचं नाव आहे. हे पुस्तक येत्या डिसेंबर महिन्यात प्रकाशित होणार आहे. या पुस्तकात त्यानं कोरोना काळात आलेले अनुभव सांगितले आहेत.

सोनूनं त्याच्या इंस्टावरून या पुस्तकाचं कव्हर पेज शेअर केलं आहे. हे पुस्तक वाचणाऱ्या व्यक्तीला प्रतिकूल परिस्थितीत संघर्ष करण्याची प्रेरणा मिळेल असा विश्वासही सोनूनं व्यक्त केला आहे.

सोनूंनं कोरोना काळात फक्त गरिबांचीच नाही तर डॉक्टर, आरोग्य कर्मचारी आणि पोलीस यांनाही मोलाची मदत केली आहे. त्यांना पीपीई किट देणं किंवा राहण्यासाठी हॉटेल देणं अशी अनेक प्रकारची मदत त्यानं केली आहे.