Video : सर्वांचा ‘बाप’ अभिनेता सोनू सूदचं ‘बॉटल कॅप चॅलेंज’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारने नुकतंच आपल्या अनोख्या अंदाजात बॉटल कॅप चॅलेंज पूर्ण केलं. शिवाय त्याचा व्हिडीओ पोस्ट करत त्याने इतरांनाही हे आव्हान दिलं. अनेक बॉलिवूड कलाकारांनी हे चॅलेंज स्विकारलं आणि पूर्णही केलं. आता हे चॅलेंज स्विकारत आणि पूर्ण करत अभिनेता सोनू सूदनेही आपला व्हिडीओ पोस्ट केला आहे. सोनू सूदने एकदम हटेक अंदाजात हे चॅलेंज पूर्ण केलं आहे.

सोनू सूदने शेअर केलेल्या व्हिडीओत दिसत आहे की, सोनू सूदने हँगिंग एक्सरसाईज करतानाच आपल्या पायांनी हलकेच किक करत हे चॅलेंज पूर्ण केलं आहे. असं वाटत आहे सोनू सूद हवेत चालत आहे आणि चालता चालताच पायाने लाथ मारत बॉटलचं झाकण पाडत आहे. सोनूचा हा व्हिडीओ सोशल खूप व्हायरल होत आहे.

सोनू सूदने ट्विटरवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. चाहत्यांना हा व्हिडीओ खूपच भावला आहे. अनेक चाहत्यांनी या व्हिडीओला बॉटल कॅप चॅलेंजचा बाप असे म्हटले आहे. काहींनी असेही म्हटले आहे की, त्यांनी जेवढे व्हिडीओ पाहिले आहेत त्यात हा सर्वात जबरदस्त व्हिडीओ आहे.

कलाकरांनी हे तर हे चॅलेंज स्विकारत ते पूर्ण केले आहेच परंतु अनेक चाहत्यांनीही हे चॅलेंज पूर्ण केल्याचे दिसत आहे. कलाकरांपैकी हे चॅलेंज पूर्ण करणारी अनेक नावे सांगता येतील. सिद्धार्थ चतुर्वेदी, टायगर श्रॉफ, अनिता हसनंदानी, विद्युत जामवाल, अदा शर्मा अशा नावांचा यात समावेश आहे.

Loading...
You might also like