सोनू सूदच्या मदतीने किर्गिस्तानमध्ये अडकलेले विद्यार्थी ‘मायदेशी’ परतले

पोलिसनामा ऑनलाईन टीम – सोनूने विदेशात अडकलेल्या 1500 विद्यार्थ्यांना पुन्हा मायदेशी आणले आहे. भारतातील जवळपास 3 हजार विद्यार्थी किर्गिस्तानमध्ये शिक्षण घेत असून कोरोना संकटामुळे हे विद्यार्थी तेथेच अडकले होते. या विद्यार्थ्यांच्या पहिल्या बॅचला सोनूने भारतात परत आणले आहे. ट्विट करत त्याने ही माहिती दिली.

किर्गिस्तानमध्ये अडकलेल्या 3 हजार विद्यार्थ्यांना पुन्हा मायदेशी घेऊन येणार असे आश्वासन सोनूने दिले होते. त्यानुसार, त्याने या स्पाइस जेटच्या मदतीने यातील 1500 विद्यार्थ्यांना भारतात आणले आहे. यातील काही फ्लाइट्स काल रात्री उशीरा वाराणसी विमानतळावर पोहोचल्याचे त्याने सांगितलं. आज खूप आनंद होतोय किर्गिस्तान ते वाराणसी हे पहिले उड्डाण यशस्वी झाले आहे.

स्पाइस जेटचे मनापासून आभार. माझ्या कामात साथ दिल्यामुळे मनापासून आभार. या पहिल्या उड्डाणानंतर दुसरी फ्लाइट 24 जुलै रोजी पुन्हा उर्वरित विद्यार्थ्यांना घेण्यासाठी जाईल. किर्गिस्तानमध्ये असलेल्या सगळ्या विद्यार्थ्यांना माझी विनंती आहे की लवकरात लवकर तुमची माहिती आमच्यापर्यंत पोहोचवा, असे ट्विट सोनूने केले आहे.