प्रवासी मजुरांना मदत करणार्‍या सोनू सूदची स्मृती इराणी यांच्याकडून प्रशंसा, म्हणाल्या – ‘तुमच्या कामावर खुप गर्व’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –   कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन सुरु आहे. त्यामुळे देशातील विविध भागामध्ये अनेक मजूर अडकले आहेत. हाताला काम मिळत नसल्याने जवळ पैसे नसल्याने अनेकांनी पायी, काहींनी सायकल तर काहींनी मिळेल त्या साधनांची मदत घेऊन घरी जाण्याचा निर्णय घेतला. मात्र, या मजुरांचा हा प्रवास इतका सोपा नव्हता. या दरम्यान बॉलिवूड अभिनेता सोनू सूद याने पुढाकार घेऊन अनेक मजुरांना त्यांच्या गावी पोहचवण्यासाठी मदत करण्यास सुरुवात केली. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी सोनूच्या या कामाची प्रशंसा केली आहे.

सोनू सूद मुंबईसह महाराष्ट्रात अडकलेल्या उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, पश्चिम बंगालसह अनेक राज्यांतील नागरिकांना त्यांच्या घरी पोचवण्यासाठी मदत करत आहे. अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सोनूशी संवाद साधला. सोनूनेही त्यांना उत्तर देत मदतीचं आश्वासन दिलं. अशा एका ट्विटला सृती इराणी यांनी रिट्विट करत रिप्लाय दिला आहे.

स्मृती इराणी यांनी म्हटलं आहे की, सोनू हे माझं भाग्य आहे की मी एक प्रोफेशनल सहकारी म्हणून तुम्हाला गेल्या दोन दशकांपासून ओळखते. अभिनेता म्हणून तुमची प्रगती पाहून आनंद झाला. मात्र, कोरोनाच्या परिस्थितीत तुम्ही जी दानशूर वृत्ती दाखवलीत, त्याबद्दल मला तुमच्यावर जास्त गर्व आहे. गरजूंना मदत केल्याबद्दल तुमचे धन्यवाद, असे स्मृती इराणी यांनी म्हटले आहे.

स्मृती इराणी यांच्या ट्विटला सोनू सूदनं देखील उत्तर दिलं आहे. सोनू सूद म्हणतो, धन्यवाद, तुम्ही नेहमी प्रेरणादायी आहात. तुमच्या स्तुतीमुळे मेहनत करण्याची आणखी प्रेरणा मिळाली आहे. जोपर्यंत आपले प्रत्येक भाऊ-बहीण सुखरुप घरी पोहचत नाहीत, तोपर्यंत मी सोबत असेन.

सोनू सूद करत असलेल्या कामाची माहिती वाऱ्यासारखी मुंबईत पसरली आहे. मुंबईच्या कानाकोपऱ्यातून सोनूला टॅग करून लोक आपण अडकलो असल्याचे सांगू लागले आहेत. शक्य त्या सर्वांना सोनू रिप्लाय देऊ लागला आहे. कुणतीतरी आपल्या मामाची कैफियक घेऊन येतो. त्यावर सोनू रिप्लाय देतो, मामा से कहना आप भांजे के बजह से घर जा रहे हो… कुणी आई बाबा एकटे असल्याचं सांगतात, याला सोनू रिप्लाय देतो, अम्मी अब्बू से कह दो जल्ही ही मिलते है… नंबर भेजो… कुणतरी अडकलेला सोनूला टॅग करून आपली परिस्थिती सांगतो… त्यावर सोनू रिप्लाय देताना सांगतो… परेशानी गई तेल लेने… मुस्कुराए… आप जल्ही घर जाएंगे…

अशा प्रकारचे अनेकांना आपल्या व्यथा मांडणारे मेसेज सोनू सूदला टॅक करून पाठवले आहेत. महाराष्ट्राचे मंत्री जयंत पाटील, स्मृती इराणी यांच्यासह अनेकजण सोनूचं कौतुक करत आहेत. बॉलिवूडमध्ये खलनायक भूमिका साकारणारा सोनू सध्या तरी अनेकांसाठी हिरो बनला आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like