सोनू सूदच्या नावावर फसवणूक करणाऱ्या E-Mail चा पर्दाफाश ! अभिनेत्यानं लोकांना केलं सावधान

पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना व्हायरस लॉकडाउनमध्ये (COVID-19 pandemic Lockdown) सतत लोकांची मदत करणारा बॉलिवूड अभिनेता सोनू सूद (Sonu Sood) अजूनही चर्चेत आहे. या सकंटकाळात अनेक ठिकाणी अडकलेल्या लोकांची तो सतत मदत करताना दिसला होता. पडद्यावरील हा खलनायक रिअल लाईफमध्ये सुपर हिरो ठरताना दिसला. अनेक गरिबांना, बेरोजगारांना, विद्यार्थ्यांनाही त्यानं मदत केली. परंतु आता त्याच्या नावावर फसवणूक करणाऱ्यांचा त्यानं पर्दाफाश केला आहे. त्यानं एक पोस्ट शेअर करत साऱ्यांना सावधान केलं आहे.

सोनूनं ट्विटरवर एक पोस्ट शेअर केली आहे. एका पोस्टला त्यानं रिट्विट केलं आहे. यात त्याच्या टीमनं एका व्यक्तीच्या फेक ई-मेलचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे. याला फेक असल्याचं सांगत लिहिलं की, सोनू सूद आणि त्याच्या टीमनं कधी कोणाला लोन दिलेलं नाही. त्यांना गॅरंटी आहे की, त्यांनी कोणत्याही लोन पेपरला सपोर्ट केलेला नाही. कृपया सावधान राहा. हीच पोस्ट रिट्विट करत सोनूनं लिहिलं की, सावधान!

याशिवाय सोनूनं ट्विटरच्या कव्हरला एक फोटो शेअर केला आहे. यात त्यानं लिहिलं की, आमच्या सेवा फ्री आहेत. कोणालाही पैसे देऊ नका. सोनूची पोस्ट सध्या सोशलवर व्हायरल होताना दिसत आहे.

सोनूच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं, तर रोहित शेट्टी डायरेक्टेड सिंबा सिनेमात तो शेवटचा दिसला होता. या सिनेमात रणवीर सिंग आणि सारा अली खान प्रमुख भूमिकेत होते. सोनूनं बॉलिवूडसोबतच अनेक साऊथ इंडियन सिनेमातही काम केलं आहे.