काय सांगता ! होय, ‘त्या’ कुटुंबानं वेगळया पध्दतीनं मानले ‘आभार’ अन् बाळाचं नाव ठेवलं ‘सोनू सूद श्रीवास्तव’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – लॉकडाउनमध्ये अभिनेता सोनू सूदने स्थलांतरित मजुरांना त्यांच्या राज्यात पाठवण्याची मोहिम हाती घेतली आहे.  स्थलांतरित मजूर घरी पोहचेपर्यंत मी ही घर भेजो मोहीम सुरु ठेवणार आहे, असे सांगणारा सोनू सध्या बराच चर्चेत आहे.  मोहिमेअंतर्गत आतापर्यंत त्याने हजारो मुजरांना त्यांच्या राज्यामध्ये परत पाठवले आहे. सोनूने केलेल्या मदतीची जाण ठेवत घरी सुखरुप पोहचलेल्या अनेक मजुरांनी त्याचे आभार मानले आहेत. एका महिलेने सोनूने केलेली मदत आयुष्यभर लक्षात रहावी म्हणून  मुलाचे नाव ‘सोनू सूद’ असे ठेवले आहे.

सोनूने काही मजुरांना दरभंगाला पाठवले होते. त्या मजुरांपैकी दोन महिला गरोदर होत्या. त्यापैकी एका महिलेने नुकताच एक  बाळाला जन्म दिला. त्यानंतर त्याचे नाव ‘सोनू सूद’ असे ठेवले आहे. कुटुंबातील सदस्यांनी मला फोन करुन आम्ही बाळाचे नाव सोनू सूद ठेवले आहे अशी माहिती दिल्याचे सूदने सांगितले. पण तुमचे अडनाव तर श्रीवास्तव आहे तर मुलाचे नाव सोनू सूद कसे असू शकता? असा प्रश्न मी त्यांना विचारला. त्यावेळी त्यांनी मुलाचे नाव सोनू सूद श्रीवास्तव असे असल्याची माहिती दिली. ते ऐकून मला खूप छान वाटले, असे सोनू सुदने सांगितले.

मजुरांना त्यांच्या राज्यात पोहचवण्याची सुविधा करण्यात आली आहे.  अनेक श्रमिकांना राज्यात जाण्यात अडचणी येत आहेत. यासाठी सोनूने पुढाकार घेतला असून तो मुंबईसहीत देशातील वेगवेगळ्या भागांमध्ये अडकलेल्या उत्तरेतील मजुरांना घरी पोहचवण्यासाठी बस गाड्यांची सोय करताना दिसत आहे. सोनूकडे थेट ट्विटवरुन मदतीची मागणी करणार्‍यांची संख्या वाढली आहे. या लोकांना सोनू थेट ट्विटवरुन मदत करतानाही दिसत आहे.