काय सांगता ! होय, तब्बल 170 कामगारांना घरी जाण्यासाठी खास चार्टर्ड विमान, सोनू सुदनं केलं हे काम

पोलिसनामा ऑनलाईन टीम – लॉकडाऊनमुळे विविध राज्यांमध्ये अडकलेल्या कामगारांना घरी जाण्यासाठी बॉलिवूड अभिनेता सोनू सुदने मदत केली आहे. सोनूने आतापर्यंत स्वतःच्या खर्चाने कर्नाटक, उत्तर प्रदेश, बिहारमधील कामगारांना घरी पोहचवण्याची व्यवस्था करुन दिली आहे. केंद्र सरकार हळुहळु सर्व गोष्टी सुरु करण्याच्या तयारीत आहे.

तरीही सोनूने कामगारांना घरी पाठवण्याचे काम सुरुच ठेवले आहे. उत्तराखंडातील देहरादून येखील 170 कामगारांना सोनूने खास चार्टर्ड विमानाची सोय केली आहे. विमान 173 कामगारांना घेऊन मुंबई विमानतळावरुन शुक्रवारी दुपारी दोन वाजल्याच्या दरम्यान उडाले होते. 4 वाजून 41 मिनीटांनी हे सर्व कामगार देहरादून विमानतळावर पोहचले होते. सर्व कामगारांच्या तिकीटाचा खर्च सोनू सुदने केला होता. चार्टर्ड विमान या कामगारांना घेऊन गेल्यानंतर, मी अजुनही अडकलेल्या कामगारांना मदत करु शकतो हा आत्मविश्वास मला मिळाला आहे.

त्यांच्यापैकी अनेक कामगारांनी कधीही विमानप्रवासाची कल्पना केली नव्हती. पण ज्यावेळी त्यांना मी तुम्ही विमानाने घरी जाणार आहात असे सांगताच त्यावेळी त्यांच्या चेहर्‍यावरचे हास्य आणि आनंद पाहण्यासारखा होता. सोनूने आपली भावना व्यक्त केली. गरजेनुसार यापुढेही अशाच प्रकारे विमानांची सोय करण्याची तयारीही यावेळी त्याने दाखवली आहे. याआधीही सोनूने केरळमध्ये अडकलेल्या 167 ओडिशातील कामगारांना त्यांच्या घरी जाण्यासाठी अशाच प्रकारेच चार्टर्ड विमानाची सोय केली होती. गेल्या काही दिवसांमध्ये अनेक कामगार सोनू सुदला मदतीसाठी सोशल मीडियावर संपर्क करत आहेत.