हजारो मजुरांना बसनं गावी पाठवणाऱ्या सोनू सूदनं आता केरळच्या 177 मुलींना केलं ‘एअरलिफ्ट’

पोलीसनामा ऑनलाइन टीम  – शेकडो बसची सोय करून हजारो प्रवासी मजुरांना त्यांच्या गावी पोहोचवणाऱ्या अ‍ॅक्टर सोनू सूदनं आता केरळच्या एर्नाकुलममध्ये अडकलेल्या उडीसाच्या 177 मुलींना एअरलिफ्ट करण्यात मदत केली आहे.

खास बात अश की या सर्व मुली एर्नाकुलमच्या एका स्थानिक फॅक्टरीत शिवणकाम, भरतकाम आणि विणकाम करत होत्या. एका वृत्तवाहिनीसोबत या संदर्भात बोलताना सोनू सूद म्हणाला, “जेव्हा मला भुवनेश्वरमध्ये राहणाऱ्या एका मित्राकडून याबद्दल समजलं तेव्हा मी त्या मुलींची मदत करण्याचा निर्णय घेतला. या सर्व मुलींना मदत करत त्यांच्या घरी पोहोचवल्यानंतर मी खूप खुश आहे.”

सोनू म्हणाला, “लॉकडाऊनमुळं या सर्व मुली केरळमध्य्ये फसल्या होत्या. परंतु आता लवकरच त्या आपल्या कुटुंबाकडे पोहोचत आहेत. माझ्यासाठी यापेक्षा जास्त आनंदाची गोष्ट दुसरी कोणतीच नाही.”

सोनूनं मुलींना सही सलामत भुवनेश्वरला पोहोचवण्यासाठी त्यांन कोचीमधून एअरलिफ्ट केलं. यासाठी बंगळुरूमधून खास एअरक्राफ्टची सोय केली होती.

सोनू सूद सध्या प्रवासी मजुरांना त्यांच्या घरी पोहोचण्यासाठी मदत करत आहे. त्याच्यामुळं अनेकजण सध्या त्यांच्या कुटुंबीयांसोबत टाईम स्पेंड करत आहेत. सोनू या मजुरांची मदत एखाद्या देवदूताप्रमाणे करत आहे. महाराष्ट्रातील विविध ठिकाणी अडकलेल्या मजुरांना एका ट्विटवर किंवा मेसेजवर त्यांच्या घरी सोडत आहे. सोनू सूदनं मजुरांच्या मदतीसाठी हेल्पलाईन नंबरही प्रसिद्ध केला आहे. सर्वजण सोनूचं कौतुक करत आहेत.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like