नशीब सोनू सुद महाराष्ट्रात आहे, UP मध्ये असता तर …काँग्रेसचे ट्विट व्हायरल

पोलिसनामा ऑनलाईन – लॉकडाउनमुळे सर्वसामान्य नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. हातावर पोट असणार्‍या अनेक स्थलांतरित मजुरांचे हाल होत असल्यामुळे त्यांनी घरी परतण्याचा निर्णय घेतला. मात्र लॉकडाउनमुळे त्यांना चालत घरी जावे लागत आहे. त्यामुळे मजुरांना घरी पोहोचवण्यासाठी बॉलिवूड अभिनेता सोनू सूद आणि त्याची संपूर्ण टीम प्रयत्न करत आहे. अशातच यूपी काँग्रेसने तेथील सरकारवर निशाणा साधत ट्विट केले आहे.

यूपी काँग्रेसने नुकताच एक ट्विट केले आहे. त्यांनी ट्विटमध्ये ‘खर तर आभारचे मानायला हवे की, सोनू सूद हे महाराष्ट्रात चांगले काम करून, उत्तर प्रदेशमधील लोकांची मदत करत आहेत. उत्तर प्रदेशमध्ये असते तर यूपी सरकार पहिले बसला स्कुटर बोलली असती, त्यानंतर त्यांच्या प्रकृतीशी संबंधीत कारणे दिली असती आणि सोनू सूदला तुरुंगात टाकले असते. योगी सरकार चांगले कार्य कार्य केल्यावर तुरुंगात पाठवते’ असे म्हणत योगी सरकारवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे.

यूपी काँग्रेसचे हे ट्विट सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहे. लोक त्यावर प्रतिक्रिया देत आहेत. गेल्या काही दिवसांपासून सोनू सूद मजुरांची मदत करत आहे. सोनूने महाराष्ट्र सरकारकडून विशेष परवानगी घेऊन काही गाड्यांची सोय केली आहे. या गाड्यांमार्फत महाराष्ट्रातील मजूरांना त्यांच्या गावी नेऊन सोडले जात आहे. यापूर्वी सोनू सूदने त्याचे मुंबईमधील हॉटेल डॉक्टरांना विश्रांती घेण्यासाठी खुले केले होते.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like