मदतीसाठी सोनू सूदनं खुलं केलं हॉटेल, म्हणाला- ‘AC मध्ये बसून ट्विट केल्यानं मजुरांचं भलं होणार नाही’ !

पोलिसनामा ऑनलाइन –अभिनेता सोनू सूदनं सर्वात आधी मुंबईतील जुहूमधील हॉटेलचे दरवाजे मेडिकल वर्कर्ससाठी उघडले होते. जेव्हा त्याला कळलं होतं की काही मेडिकल वर्कर्सला त्यांच्या बिल्डिंगमध्ये जाऊ दिलं जात नाही. त्यांच्या वाईट वागणूक दिली जात आहे. यानंतर त्यानं त्याचं हॉटेल ओपन केलं होतं आणि म्हटला होता की रुग्णालयात काम केल्यानंतर मेडिकल वर्कर्स त्याचं हॉटेल शक्ती सागरमध्ये आराम करायला आणि झोपायला येऊ शकतात.

‘आपण फक्त एसीमध्ये बसून ट्विट नाही करू शकत’

एका न्यूज एजन्सी सोबत बोलताना सोनू सूद म्हणाला की, “मला वाटतं हे माझं कर्तव्य आहे की, आपण प्रवासी आणि देशाच्या हृदयस्थानी असलेल्या माणसांना मदत करावी. आपण अनेक प्रवासी कुटुंबांना आणि मुलांना रस्त्यावरून आणि महामार्गावरून जाताना पाहिलं आहे. आपण फक्त एसीमध्ये बसून ट्विट नाही करू शकत. तोपर्यंत आपण रस्त्यावर जात नाही जोपर्यंत आपण त्यांच्यापैकी एक बनत नाही.”

‘कधी वाटतं स्वत:च गाडी चालवत जावं आणि त्यांना गावी सोडावं’

सोनू म्हणतो, “जेव्हा मी त्या पीडितांना किंवा प्रवाशांना पाहतो तेव्हा असं वाटतं की, त्यांनाही माणूस म्हणून जगण्याचा अधिकार आहे. मला रात्री नीट झोप येत नाही. डोक्यात हेच सुरू असतं. कधी वाटतं स्वत:च गाडी चालवत जावं आणि त्यांना गावी सोडावं. त्यांना त्यांच्या कुटुंबीयांना भेटवावं. आता अनेक मेल येतात ज्यांना प्रवास करायचा आहे. रोज हेच काम असतं मला. यात मला किती आनंद मिळतो हे मी शब्दात नाही सांगू शकत.”

https://www.instagram.com/p/B_WpnohgWy5/?utm_source=ig_embed