Sonu Sood कोरोनातून बरे होताच पुन्हा बनला देवदूत, एका मजूरासाठी केले ‘हे’ काम

नवी दिल्ली : बॉलीवुड अ‍ॅक्टर आणि अडचणीत सापडलेल्या लोकांना मदत करणार्‍या सोनू सूदने कोरोनाशी युद्ध जिंकले आहे. त्याने अवघ्या एका आठवड्यातच कोरोनावर मात केली. परंतु कोरोनातून बरे झाल्यानंतर सोनू सूद मदत करण्यात मागे हटलेला नाही. त्याने पुन्हा एकदा काही असे केले आहे ज्यास मजूरांचा देवदूत म्हणत आहेत.

6 दिवस भटकत असलेल्या मजूराला मिळाला बेड
सोनू सूद पुन्हा एकदा रूग्णांसाठी देवदूत बनून समोर आला आहे. त्याने बेडसाठी सहा दिवसांपासून भटकत असलेल्या मजूरासाठी बेडची व्यवस्था केली आहे. रोशनी बुराडे नावाच्या एका ट्विटर यूजरने सोनू सूदला टॅग करत पोस्ट लिहिली होती. ज्यात तिने लिहिले होते, सोनू सूद माझे पप्पा कोविड पॉझिटिव्ह आहेत, त्यांना व्हेंटिलेटरची खुप गरज आहे, परंतु संपूर्ण नागपुरमध्ये व्हेंटिलेटर उपलब्ध नाही. सर, प्लीज मदत करा, माझ्या पप्पांना वाचवा.

1 तासात व्हेंटिलेटरचे आश्वासन
मात्र, या दरम्यान सोनू सूद सुद्धा कोविडशी लढा देत होता, परंतु त्याने आपल्यापेक्षा अगोदर गरजू व्यक्तीला प्राधान्य दिले. ट्विटच्या उत्तरादाखल सोनू सूदने लिहिले होते, तुझ्या पप्पांना काहीही होऊ देणार नाही. 1 तासात पप्पांना व्हेंटिलेटर बेड मिळेल. यानंतर झी न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार या रूग्णाला बेड मिळाला आहे.

अशी शेयर केली खुशखबर
सोनू सूदने प्रकृती ठीक झाल्याची माहिती आपल्या चाहत्यांना एक छायाचित्र शेयर करून दिली होती. ज्यामध्ये तो आपल्या हाताने निगेटिव्हचे चिन्ह बनवताना दिसत होता. या ट्विटनंतर सोनूच्या चाहत्यांनी त्याच्या दिर्घायुष्यासाठी प्रार्थना केली आणि आनंद व्यक्त केला.