सोनू सूदनं दिली महाराष्ट्र पोलिसांना अनोखी भेट, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मानले आभार

पोलिसनामा ऑनलाईन टीम – राज्यात मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. अशा परिस्थितीत बॉलिवूडचा कलाकार सोनू सूद हा सर्वांनाच मदतीचा हात देत आहे. अशातच सोनू सूदने महाराष्ट्र पोलिसांसाठी तब्बल 25 हजार फेस शिल्ड दिल्या आहे. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी याबाबत माहिती दिली आहे. त्यांनी सोनूचे आभारही मानले आहेत.


अनिल देशमुख यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर सोनू सूद आणि त्यांचा एक फोटो शेअर केला आहे. पोलीस कर्मचार्‍यांसाठी 25 हजार फेस शिल्ड दिल्याबद्दल सोनू सूद यांचे आभार, असे कॅप्शनही त्यांनी या फोटोला दिले आहे. सोनू सूदच्या या कार्यांबद्दल अनेकांकडून त्याची स्तुतीही करण्यात आली आहे. सोशल मीडियावरही अनेक युझर्सने त्याचे कौतुक केले आहे. सोनू सूदनेही तो फोटो शेअर करत भावना व्यक्त केल्या आहे. आपले पोलीस बांधव आणि भगिनी हे खरे हिरो आहेत. ते करत असलेल्या कार्यासमोर हे फारच कमी आहे, असेही सोनू म्हणाला.