सोनू सूदनं दाखवले शानदार ‘ॲब्ज’ ! रणवीर सिंग, सुनील शेट्टी म्हणाले…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड स्टार सोनू सूद (Sonu Sood) याचा पागल नहीं होना हा म्युझिक व्हिडीओ अलीकडेच रिलीज झाला. या व्हिडीओत तो ॲक्ट्रेस आणि सिंगर सुनंदा शर्मा (Sunanda Sharma) सोबत दिसला. यानंतर आता आपल्या एका फोटोमुळं सोनू पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. यात त्याचा अवतार पाहून बॉलिवूडमधील दिग्गजांनीही कमेंट करत त्याचं कौतुक केलं आहे.

सोनूनं त्याच्या इंस्टावरून एक फोटो शेअर केला आहे. यात त्याचा फिटनेस फ्रिकवाला अवतार दिसत आहे. सोनू सूदनं दिलेली पोज खास लक्ष वेधून घेताना दिसत आहे. फोटोत तो एका हातानं बनियान वर करून त्याचे ॲब्ज फ्लाँट करत आहे. फोटो शेअर करताना त्यानं म्हटलं की, शो ऑफ.

सोनूचा हा फोटो समोर आल्यानंतर चाहत्यांसह अनेक सेलेब्सनंही यावर कमेंट केल्या आहेत. रणवीर सिंग यावर कमेंट करत म्हणाला, कुणतरी चहा मागवा. यावर सोनूनंही रिप्लाय देत लिहिलं की, रणवीर सिंग माझ्या भावासाठी मलाई मारून. इतकंच नाही तर रवीना टंडन, सुनील शेट्टी आणि फराह खान यांनीही कमेंट सोनूचं कौतुक केलं आहे.

सोनूचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. त्याच्या अनेक चाहत्यांनी तिच्या या फोटोवर लाईक्स आणि कमेंटचा पाऊस पाडला आहे. काहींनी हे फोटो शेअर केल्याचंही दिसत आहे.

सोनूच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर रोहित शेट्टी डायरेक्टेड सिंबा सिनेमात तो शेवटचा दिसला होता. या सिनेमात रणवीर सिंग आणि सारा अली खान प्रमुख भूमिकेत होते. सोनूनं बॉलिवूडसोबतच अनेक साऊथ इंडियन सिनेमातही काम केलं आहे.