सोनू सूदच्या नावावर केली जातेय ‘लूट’, अभिनेत्यानं केलं सावध

पोलिसनामा ऑनलाईन टीम –   मजूरांना मूळगावी पोहोचविण्यासाठी अभिनेता सोनू सूद आघाडीवर आहे.
आतापर्यंत त्याने एक हजारांपेक्षा अधिक मजुरांना घरी पोहोचवले आहे. यापार्श्वभूमीवर सोनू सूदच्या नावाने आता खोटे मेसेज सोशल मीडियावर पसरवले जात आहे. त्याचे नाव सांगून मजुरांकडून पैसे लुबाडले जात असल्याचे ट्वीट सोनू सूदने केले आहे. खोट्या मेसेजच्या जाळ्यात अडकू नका. मदतीच्या बदल्यात आम्ही कोणाकडूनही पैसे घेतलेले नाहीत. आमची सेवा मोफत आहे. त्यामुळे जर कोणी आमचे नाव सांगून पैशांची मागणी करत असेल तर त्याची पोलिसांकडे तक्रार करा. अशा आशयाचा मेसेज सोनू सूदने केला आहे.

महाराष्ट्र सरकारकडून विशेष परवानगी घेऊन सोनूने मजूरांसाठी काही गाड्यांची सोय केली आहे. या गाड्यांमार्फत महाराष्ट्रातील मजूरांना त्यांच्या गावी नेऊन सोडले जात आहे. राज्यातील शेवटचा मजूर मूळगावी पोहोचेपर्यंत मी शांत बसणार नाही. असे त्याने सांगितले आहे. त्याच्या मदतीमुळे मजुरांना त्यांच्या गावी सोडण्याचा महाराष्ट्र सरकारवरचा भार काही प्रमाणात कमी झाला आहे. यापूर्वी सोनुने एक हजार 500 पीपीई किट्सची मदत केली होती. तसेच हॉटेल करोनाग्रस्तांच्या उपचारासाठी खुले करुन दिले होते. मात्रा, त्याच्या नावावर काहीजणांकडून मजरांकडून पैसे उकळले जात असल्याचे दिसून आले आहे.