म्हणून किरण ढाणेचं सोशल मीडियावर होत आहे खास कौतुक

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – एक होती राजकन्या ही मराठी वाहिनीवरील मालिका नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. या मालिकेचा पहिला एपिसोड नुकताच प्रदर्शित झाला आहे. या मालिकेत किरण ढाणे हिने मुख्य भूमिका साकारली आहे. अवनी जयराम भोसले या नावाने तिने व्यक्तिरेखा साकारली आहे.

अगदी पहिल्याच एपिसोडपासून तिने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. ही अवनी प्रेक्षकांना फार आवडली आहे. अवनी ही मूळची नागपूरची असल्याने तिच्या बोलण्यात नागपुरी भाषेचा वापर जास्त असल्याचं दिसत आहे. प्रेक्षकांना ही नागपुरी भाषा विशेष आवडताना दिसत आहे. इतकेच काय तर सोशल मीडियावरही सध्या त्याची चर्चा असल्याचं दिसत आहे.

नागपुरी भाषेचा गोडवा वाढवणाऱ्या अवनीचा पुढील प्रवास पाहण्यासाठी चाहते उत्सुक

मालिकेच्या पहिल्या एपिसोडमध्येच किरणने तिच्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली. तिच्या अभिनयानंतर सोशलवर तिला चांगला प्रतिसादही मिळाला. ‘विदर्भाची भाषा बोलून राहिलं नं’, ‘आतुरता पुढील एपिसोडची’, ‘कमाल अभिनय’ असे कमेंट्स सोशल मीडियावर येऊ लागले. असा प्रश्न किरणने सोशल मीडियावर केला होता. त्यावर प्रेक्षकांनी तिचं तोंडभरून कौतुक केलं आहे. नागपुरी भाषेचा गोडवा वाढवणाऱ्या अवनीचा पुढील प्रवास पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत असे दिसत आहे.

मालिकेविषयी थोडक्यात..

एक होती राजकन्या या मालिकेत किरण ढाणे हिने मु्ख्य भूमिका साकारली आहे. अवनी जयराम भोसले ही व्यक्तिरेखा तिने साकारली आहे. अभिनेते किशोर कदम आणि अभिनेत्री किरण ढाणे यांच्या अभिनयाने सुरुवात झालेल्या या मालिकेत एकंदरीत वडील आणि मुलीच्या गोड नात्याची गुंफण पाहायला मिळत आहे. डाॅक्टर होऊन समाजाची सेवा करणार असे स्वप्न अवनीने पाहिलेले असते. परंतु अवनीची कॉन्स्टेबल म्हणून प्रवासाला सुरुवात झाली आहे. ती नुकतीच अनुकंपा तत्वावर पोलीस खात्यात भरती झाली आहे असे मालिकेत दाखवण्यात आले आहे.

You might also like