Amazon लवकरच आपल्या वस्तू ‘ड्रोन’च्या माध्यमातून 30 मिनिटांत पोहोचवणार तुमच्या घरी, मिळाला एअर ‘कॅरियर’चा परवाना

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था –   जगातील सर्वात मोठी ई-कॉमर्स कंपनी अ‍ॅमेझॉन (Amazon) लवकरच आपल्या घरात ड्रोनद्वारे सामान वितरण करेल. अ‍ॅमेझॉन ड्रोनद्वारे डिलिव्हरी करण्याचे लक्ष्य साधत आहे आणि ते पूर्ण करण्याच्या दिशेने एक एक पाऊल पुढे टाकत आहे. यावर अमेरिकेचे फेडरल एव्हिएशन अ‍ॅडमिनिस्ट्रेशन (एफएए) चे म्हणणे आहे की त्यांनी अ‍ॅमेझॉनला ड्रोनद्वारे पॅकेज वितरित करण्यास परवानगी दिली आहे.

ड्रोनद्वारे डिलिव्हरी कधी सुरू होईल

अ‍ॅमेझॉन सध्या ड्रोनचे उड्डाण व इतर चाचण्या घेत आहे. कंपनीचे म्हणणे आहे की ते ड्रोनद्वारे ग्राहकांना वस्तू वितरित करण्यास कधी सुरुवात करतील हे सांगणे अद्याप कठीण आहे. ई-कॉमर्स क्षेत्रातील दिग्गज कंपनी अनेक वर्षांपासून ड्रोनद्वारे वस्तूंच्या पुरवठ्यावर काम करत आहे. परंतु यास अनेक नियामक अडथळ्यांचा सामना करावा लागला आहे. अ‍ॅमेझॉनचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) जेफ बेझोस यांनी 2013 मध्ये एका टीव्ही मुलाखतीत सांगितले होते की, कंपनी पाच वर्षांत ड्रोनमार्फत ग्राहकांना वस्तू वितरित करण्यास सुरवात करेल.

ड्रोन इतके सामान घेऊन जाऊ शकतात

अ‍ॅमेझॉनला पार्ट 135 एअर कॅरियर प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे. यामुळे कंपनी आपले प्राइम एअर ड्रोन वापरण्यास सक्षम असेल. अ‍ॅमेझॉनचे म्हणणे आहे की त्यांना त्यांच्या ऑपरेशनच्या सुरक्षिततेचा पुरावा द्यावा लागेल आणि एफएएच्या समोर ते दाखवावे लागतील. प्राइम एअरचे उपाध्यक्ष डेव्हिड कार्बन म्हणाले की हे प्रमाणपत्र मिळणे याचा पुरावा आहे की एफएए ला कंपनीच्या ऑपरेटिंग आणि सेफ्टी प्रोसेसरवर पूर्ण विश्वास आहे.

डिलिव्हरीची वेळ आणखी कमी करण्याचे अ‍ॅमेझॉनचे ध्येय

अ‍ॅमेझॉन जगातील अनेक देशांमध्ये एका दिवसात डिलिव्हरी देत आहे. पण त्यांचे ध्येय डिलिव्हरीची वेळ अजून कमी करणे हे आहे.

तीन कंपन्यांना मिळालेले आहे प्रमाणपत्र

अ‍ॅमेझॉन पार्ट 135 एअर कॅरियर प्रमाणपत्र मिळवणारी तिसरी कंपनी आहे. यापूर्वी गुगलची मूळ कंपनी अल्फाबेटच्या विंग एव्हिएशन आणि यूपीएस फ्लाइट फॉरवर्डला हे प्रमाणपत्र मिळाले होते. पण अद्याप कोणत्याही कंपनीने मोठ्या प्रमाणात ड्रोनची डिलिव्हरी सुरू केलेली नाही.