हे ‘मेडिकल ATM’ काही मिनिटांतच करत 58 प्रकारच्या वैद्यकीय तपासण्या, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशभरात लवकरच नागरिकांना उत्तम आरोग्य सेवा मिळणार आहेत. त्याचबरोबर या सेवा लवकरात लवकर आणि अत्याधुनिक मिळण्यासाठी देखील प्रयत्न केले जात आहेत. एका स्वयंचलित एटीएमसारख्या मशीनद्वारे तुम्ही 58 प्रकारच्या विविध चाचण्या करू शकता. तसेच त्याचे रिपोर्ट देखील तुम्हाला तात्काळ मिळणार आहेत. संस्कारी टेक स्मार्ट सोल्यूशन्स प्राइवेट लिमिटेड या स्टार्टअप कंपनीने हे मशीन विकसित केले आहे.

स्वयं एनीटाइम हेल्थ मॉनिटरिंग असे या उपकरणाला नाव देण्यात आले असून याद्वारे तुम्ही विविध प्रकारच्या वैद्यकीय चाचण्या करू शकता. याच्या वापराची पद्धत देखील फार सोपी असल्याचे या कंपनीच्या प्रतिनिधीने सांगितले आहे. या उपकरणाद्वारे ग्लूकोज, डेंगू, हीमोग्लोबिन, टाइफाइड, एचआईवी, मलेरिया, चिकनगुनिया, एलिफेंटियासिस, मूत्र चाचणी, ईसीजी, कानाची चाचणी आणि त्वचेचे परीक्षण करू शकता. नमुने घेतल्यानंतर काही मिनिटांतच तुमचा वैद्यकीय अहवाल छापील स्वरूपात तुम्हाला मिळतो. हे उपकरण संपूर्णपणे भारतात तयार करण्यात आल्याचा दावा या स्टार्टअप कंपनीने केला आहे. देशात मेडिकल क्षेत्रात हे मशीन क्रांती घडवणार असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे.

दरम्यान, भारतातील अनेक ठिकाणांहून आम्हाला या मशीन मागितल्या गेल्या असून गुडगाव, इंदोर आणि भुवनेश्वर मध्ये आम्ही हे उपकरण दिले आहे. हे उपकरण कुठेही लावले जाऊ शकते. कॉर्पोरेट कंपन्या, ग्रामीण आरोग्य केंद्र, शॉपिंग मॉल, विमानतळ, औद्योगिक कंपन्या यांसारख्या ठिकाणी देखील हे उपकरणे स्थापित केले जाऊ शकतात.

Visit : Policenama.com