24 तासात EPFO बदलू शकतं पेन्शन संदर्भातील ‘नियम’, नोकरदारांचा होणार मोठा ‘फायदा’, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – नोकरी करणाऱ्यांसाठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्था (EPFO) पुढील 24 तासांत मोठी घोषणा करू शकते. एका वृत्तवाहिनीला मिळालेल्या माहितीनुसार, ईपीएफओ लवकरच पेन्शनधारकांना दिलासा देणार आहे. अ‍ॅडव्हान्स पेन्शनची रक्कम घेणारे पेन्शनर्स पुन्हा पेन्शनची संपूर्ण रक्कम घेऊ शकणार आहेत. साध्या शब्दांत सांगायचे तर, पीएफसोबत वजा होणारी पेन्शन (EPS) आता आगाऊ मध्ये घेता येणार आहे. आतापर्यंत ही सुविधा फक्त सरकारी कर्मचाऱ्यांकडे मिळत असायची. परंतु आता खासगी कर्मचार्‍यांनाही या सुविधेचा लाभ घेता येणार आहे. या निर्णयामुळे सध्याला जवळपास 6.5 लाख लोकांना फायदा होणार आहे. सूत्रांकडून मिळालेल्या विशेष माहितीनुसार कामगार मंत्रालय कर्मचारी निवृत्तीवेतन योजनेतील बदलांशी संबंधित अधिसूचना संध्याकाळपर्यंत किंवा उद्यापर्यंत जारी करू शकते.

आपण जेथे नोकरी करत असता तेथे दरमहा तुमच्या पगारातून पीएफचे पैसे कपात होत असतात आणि ते कपात झालेले पैसे ईपीएफओमध्ये जमा केले जातात. पीएफमध्ये तुमच्या पगाराचा कमीत कमी 12% वाटा असतो. 12 टक्के कंपनीकडून दिले जाते. कंपनीने दिलेल्या योगदानापैकी 8.33 टक्के रक्कम पेन्शन योजनेत (EPS) जाते आणि उर्वरित 3.67 टक्के हिस्सा EPF मध्ये टाकला जात असतो.

यामुळे काय होईल
जर एखादा व्यक्ती सेवानिवृत्त होत असेल किंवा होणार असेल तर त्याच्याकडे पर्याय उपलब्ध असणार आहे की त्याला पेन्शनच्या एकूण रकमेपैकी 40% रक्कम आगाऊ घेता येऊ शकते. पेंशनधारक पुढील 10 वर्षांसाठी आगाऊ पेन्शन घेण्यास सक्षम असतील, म्हणजेच ते मासिक निवृत्तीवेतनाच्या 40% आगाऊ 10 वर्षासाठी घेण्यास सक्षम असतील.

जर सोप्या शब्दात समजावयाचे झाले तर 1000 रुपयांच्या पेन्शनवर 400 रुपये 10 वर्षे जोडता येऊ शकतात. म्हणजेच 48000 रुपये 10 वर्षांसाठी अ‍ॅडव्हान्स पेन्शन मिळवू शकतील. तोपर्यंत फक्त 600 रुपये पेन्शन मिळणार. 15 वर्षांनंतर 1000 रुपयांची पेन्शन पुन्हा सुरू होईल. ईपीएफओ 5 वर्षात व्याजाची रक्कम परत करेल. सध्या फक्त सरकारी कर्मचाऱ्यांना हा लाभ मिळणार आहे.

पेन्शनचा पैसे केव्हा मिळणार

1) PF खात्याच्या रकमेला कोणताही कर्मचारी एक ठरवलेल्या वेळानंतर काढू शकतो. परंतु पेन्शनची रक्कम काढण्यासाठी नियम कठोर स्वरूपाचे असतात, कारण ते वेगवेगळ्या परिस्थितीत निश्चित केले गेले असतात.

2) जर नोकरी 6 महिन्यापेक्षा जास्त आणि 9 वर्ष 6 महिन्यापेक्षा कमी आहे, तर फॉर्म 19 आणि 10 सी जमा करून पीएफ रकमेसोबत पेन्शनची रक्कम देखील काढली जाऊ शकते. परंतु, त्यासाठी तुम्हाला पीएफ कार्यालयात मॅन्युअल पद्धतीने अर्ज करावा लागेल.

3) ऑनलाईन प्रक्रियेमध्ये पेन्शन निधी काढून घेण्याची सुविधा अद्याप सुरू करण्यात आलेली नाही. फॉर्म भरल्यानंतर त्यांना ईपीएफओच्या कार्यालयात जमा करावे लागतील.

4) जर आपण आपला भविष्य निर्वाह निधी (PF) एका खात्यातून दुसर्‍या खात्यात हस्तांतरित करत असाल, तर आपली कितीही सर्व्हिस हिस्ट्री असो, आपण कोणत्याही परिस्थितीत पेन्शनची रक्कम कधीही काढू शकणार नाही.

5) म्हणजेच हे स्पष्ट आहे की आपण कितीही वेगवेगळ्या ठिकाणी काम केले तरीही आपली सर्व्हिस हिस्ट्री 10 वर्षांची झाल्यास आपण पेन्शनसाठी पात्र आहात आणि वयाच्या 58 व्या वर्षी तुम्हाला मासिक पेन्शन म्हणून काही वेतन मिळेल.